Auto Expo 2023: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे दोन वर्षानंतर ऑटो एक्सपो २०२३ सुरु झाला आहे. आजपासून सुरु झालेल्या या ऑटो एक्सपोमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान सहभागी झाला होता. ह्युंदाई (Hyundai) कंपनीच्या ईव्ही कारच्या लाँचिंगमध्ये तो सहभागी झाला होता. ह्युंदाईने या स्पेशल कारचे नाव Loniq 5 EV असे ठेवले आहे. लवकरच ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल केली जाणार आहे. ही कार पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Auto Expo 2023: यंदाच्या ऑटो एक्स्पोत काय खास असणार? जाणून घ्या तिकिटासह सर्व माहिती

फीचर्स

या कारचा व्हीलबेस हा ३००० मिमी इतका आहे. यामध्ये ६ एअरबॅग्ज , व्हर्च्युअल इंजिन साउंड सिस्टीम , इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक , चारही डिस्क ब्रेक्स, मल्टी कोलिजन-अवॉयडन्स ब्रेक यांचा समावेश असणार आहे. Hyundai Ioniq 5 EV फक्त १८ मिनिटांत चार्ज होते. चार्जिंग स्टेशनवर वेळ वाचवण्यासाठी ४००V आणि ८००V मल्टी-चार्जिंग सिस्टमसह सुसज्ज असणार आहे. हे ७२.६ kWh च्या उच्च-पॉवर बॅटरीद्वारे समर्थित आहे . एकदा चार्जिंग केल्यावर ६३१ किमी धावू शकेल.

यामध्ये ब्लूलिंक सेवा आणि कनेक्टेड सोल्यूशन्स जसे की व्हॉइस असिस्टंट, रिमोट सर्व्हिसेस, SOS/इमर्जन्सी सेवा , कमी टायर प्रेशर नोटिफिकेशन, लोकेशन अशी अनेक फीचर्स असणार आहेत. या कारची किंमत ४४.९५ लाख इतकी असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shah rukh khan launched hyundai loniq 5 ev car witha attractive features tmb 01