अभिनेता सोनू सूद हा जसा त्याच्या चित्रपटांसह त्याच्या दानशूर वृत्तीमुळे ओळखला जाणारा भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सोनू सूदला त्याच्या अभिनयाप्रमाणे गाड्यांची देखील आवड आहे. त्याच्याकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याला मोठ्या आलिशान आणि आरामदायी कार खूप आवडतात अशातच आता त्याने आपल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये एका नव्या कारची भर घातली आहे.
ती कार आहे BMW ची 7 सीरिज. त्याने या गोष्टीची माहिती इंस्टाग्रामवर आगामी कार्यक्रमाबाबतची प्रमोशनल पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमध्ये BMW कार शेजारी उभं असलेला फोटो पोस्ट शेअर केला आहे. BMW 7 सीरिज ही ऑटोमेकरची फ्लॅगशिप लिमोझिन असून ती बाजारात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या आणि आरामदायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ऑडी A8 L, Lexus LS 500h यासारख्या कारसोबत स्पर्धा करण्यासाठी बाजारात आणली असल्याचं बोललं जातं आहे.
हेही वाचा- १० सेकंदात हायस्पीड, १६० किमी मायलेज.. टाटा ‘नॅनो’ इलेक्ट्रिक कार बाजारात येणार? किंमत किती?
सोनू सूदने व्हाईट शेडमध्ये असणारी ७ व्या सीरिजमधील 740 Li M स्पोर्ट कार घरी आणली आहे. या कारची किंमत ₹1.42 कोटी (एक्स-शोरूम) पासून सुरु होते. महत्वाची बाब म्हणजे अभिनेता सोनू सूदकडे यापुर्वी SUV, फोर्ड एंडेव्हरपासून ऑडी Q7 पर्यंतच्या कार असून त्याने आता त्याच्या कलेक्शनमध्ये BMW 7 चा समावेश केला आहे.
भारतात फक्त BMW 7 मालिकेचा लांब व्हीलबेस प्रकार मिळतो. ज्यामध्ये 740 Li ट्रिम पॉवर 3.0-लीटर सहा-सिलेंडर, टर्बो पेट्रोल इंजिन असून त्याचा पीक टॉर्क 335 bhp आणि 450 Nm आहे. ही कार 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेली असून ती मागील चाकांनाही पॉवर देते. या कारमध्ये व्हीलबेस, मागील सीटच्या केबिनमध्ये भरपूर जागा असून खराब रस्त्यांवर प्रवास करत असताना ही कार अडॅप्टिव्ह एअर सस्पेन्शनमुळे आरामदायी वाटते.
आत्ताच्या सीरिजमध्ये या कारमध्ये किडनी ग्रिल, नव्याने तयार केलेले पुढचे आणि मागचे बंपर, लेझर लाइट हेडलॅम्प आणि रॅपराउंड LED टेललाइट्स देण्यात आल्या आहेत. तर केबिनमध्ये मेमरी सेटिंगसह इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट, मागील सीटसाठी मसाज फंक्शन, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, मनोरंजन स्क्रीनसह अनेक सुविधा देणय्यात आल्या आहेत.शिवाय ही कार iDrive इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.
दरम्यान, BMW 7 ची नवी सीरिज जागतिक बाजारपेठेत जागतिक स्तरावर पोहोचली असून तिचे मॉडेल पुढील वर्षी भारतात येण्याची शक्यता आहे. तर BMW India X7 फेसलिफ्ट, अपडेटेड M340i xDrive, सर्व-नवीन XM हायब्रीड SUV आणि 2023 S 1000 RR लाँच करून वर्षाचा शेवट करण्यासाठी सज्ज असून सर्व मॉडेल 10 डिसेंबर 2022 रोजी देशात येणार आहेत. या कार्यक्रमाला सोनू सूदही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.