Actress Poonam Pandey Car Collection: बाॅलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ३२व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. पूनम गेल्या काही दिवसांपासून कर्क रोगाशी झुंज देत होती. २ फेब्रुवारी रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे. पूनम पांडेला लक्झरी गाड्यांची आवड होती. तिच्या गॅरेजमध्ये कोणकोणत्या गाड्या होत्या जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूनम पांडे चित्रपट, मालिका किंवा टीव्ही शोमधून कमाई करत असे. यासोबतच तिने फोटोशूट, मॉडेलिंग आदी माध्यमातून चांगली कमाईही केली. पूनम पांडेने तिच्या मेहनतीने आणि स्वतःच्या बळावर करोडोंची संपत्ती निर्माण केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनम पांडेकडे जवळपास ५२ कोटी रुपयांची संपत्ती होती. पूनम पांडेचे मुंबईतल्या वांद्रे परिसरात स्वतःचे अपार्टमेंट आहे. तिच्या या आलिशान अपार्टमेंटची किंमत करोडोंमध्ये आहे. पूनम पांडेने अनेकदा बाईक अन् कारसोबतच्या आपल्या फोटो सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. पूनमकडे बीएमडब्ल्यू कार देखील होती, याशिवाय ती अनेकवेळा वेगवेगळ्या आलिशान कारमध्ये दिसली आहे.

(हे ही वाचा : ‘या’ २ कंपनीच्या बाईक अन् स्कूटर्सवर अख्खा देश फिदा; झाली धडाक्यात विक्री, ३० दिवसात ४.३३ लाख लोकांनी केली खरेदी )

BMW Car

अभिनेत्री पूनम पांडेच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू कार होती. बीएमडब्ल्यू ५ सीरीज तिच्याकडे असल्याची माहिती आहे. अनेक आकर्षक डिझाईन एलिमेंट्स आणि फीचर्ससह ही कार सुसज्ज आहे. काही मुख्य इंटीरियर फीचर्समध्ये यात १२.३-इंच पूर्ण डिजिटल इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि १२.३-इंच ड्रायव्हर डिस्प्ले आहे. याशिवाय ३-डी नेव्हिगेशनसह बीएमडब्ल्यू ऑपरेटिंग सिस्टिम ७.० देखील आहे. कारमध्ये ट्विन पॉवर टर्बो तंत्रज्ञान असेलेले २-लिटर ४-सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन जास्तीत जास्त २५२ bhp ची पॉवर आणि ३५० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार ० ते १०० किमी / ताशी वेग फक्त ६.१ सेकंदात पकडू शकते. या कारची किंमत ६० लाखाच्या घरात आहे.

Mercedes-Benz E 200

अभिनेत्री पूनम पांडेच्या ताफ्यात Mercedes-Benz E-Class कार असल्याची माहिती आहे. या कारमध्ये जबरदस्त फिचर्स पाहायला मिळतात. सात एअरबॅग्स, EBD सोबत ABS, ESP, TPMS, पार्कट्रॉनिक सोबत पार्किंग असिस्ट, अॅक्टिव ब्रेक असिस्ट आणि ३६० डिग्री कॅमेरा दिला आहे. या लक्झरी कारची किंमत ६० लाखाच्या वर असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress poonam pandey car collection from bmw 5 series to mercedes benz e200 pdb