Hydrogen Fuel Truck: पहिल्यांदाच देशात हायड्रोजन इंधानावरील ट्रक (Hydrogen run truck) चा वापर होणार असून लवकरच देशात हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रिक ट्रक दाखल होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे हायड्रोजनवर चालणारे ट्रक विकसित करणार आहेत. अशोक लेलँड आणि कॅनडाच्या बेलार्ड पॉवरसोबत हा करार करण्यात आला असून खानकामासाठी हे हायड्रोजन इंधनावरील ट्रक वापरले जाणार आहे. हे ट्रक या वर्षाअखेर दाखल होणार आहे.

अदानी समूहाने सांगितले की, ते खाण क्षेत्राशी संबंधित वाहतूक आणि लॉजिस्टिकसाठी हायड्रोजन इंधनावर चालणारे ट्रक तैनात करेल. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील गटाने एका निवेदनात म्हटले आहे की, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ने खाण लॉजिस्टिक आणि वाहतुकीसाठी हायड्रोजनवर चालणारे ट्रक विकसित करण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला आहे. अशोक लेलँड आणि बॅलार्ड पॉवरसोबत हा करार करण्यात आला आहे.

Gelatin used for sweets jams jellies candies will be made from boiler chicken waste Nagpur
मिठाई, जाम, जेली, कँडीसाठी वापरले जाणारे ‘जिलेटीन’ आता बॉयलर कोंबडीच्या वेस्टपासून बनणार…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
A survey on the use of Metro 3 by a consultancy firm in transport services Mumbai
मेट्रो ३ वापरण्यासाठी ६० टक्के मुंबईकर उत्सुक; अर्थ ग्लोबलचा अहवाल
Tata Motors Launch Curvv coupe SUV
Tata Motors : सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा अन् बरेच सेफ्टी फीचर्स; भारतात लाँच झाली कूपे-एसयूव्ही; किंमत फक्त…
Loksatta chip charitra EUV ASML Technology Social media platform
चिप-चरित्र: ‘ईयूव्ही’त ‘एएसएमएल’ची एकाधिकारशाही
Tumblr move all blogs to WordPress
इंटरनेटच्या जगातील आजवरचे सर्वात मोठे स्थलांतर! Tumblr अ‍ॅप करणार युजर्सचे ब्लॉग… वाचा नक्की काय होणार बदल
Best Selling Electric Scooter
Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी
Skoda Kylaq spotted testing: New details revealed Know Features & Design Details
Skoda Kylaq: टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली स्कोडा Kylaq; मिळणार अनेक नवीन बदल, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ)

या भागीदारीतून आशियातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या मायनिंग ट्रकचा विकास होणार आहे. प्रकल्पाचे नेतृत्व अदानी एंटरप्रायझेस करेल तर कॅनडाची कंपनी बॅलार्ड पॉवर हायड्रोजनवर चालणाऱ्या इंजिनांचा पुरवठा करेल. अशोक लेलँड ही व्यावसायिक वाहनांची जगातील आघाडीची कंपनी या ट्रकसाठी व्यासपीठ आणि तांत्रिक सहाय्य पुरवणार आहे.

Hydrogen-Fueled Electric Trucks मध्ये काय असेल खास?

हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रीक ट्रकची क्षमता ५५ टन असून त्यात तीन हायड्रोजन टाक्या असणार आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, हे ट्रक २०० किलोमीटरची वर्किंग रेंज देतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅलार्ड पॉवर या टाक्या बनवणार आहे.

त्यासाठी बॅलार्ड आपले १२० kW PEM इंधन सेल तंत्रज्ञान वापरणार असून २०२३ मध्ये इंधन सेल इलेक्ट्रिक ट्रक लाँच करणार असल्याचे अदानी समूहाने सांगितले आहे. खाणकाम आणि वाहतुकीच्या कामासाठी या ट्रकचा वापर केला जाणार आहे.