Cheap and Best Bike: देशातील तरुणवर्ग बाईकचा मोठा चाहता आहे. देशातील बहुतेक लोक लहान प्रवासासाठी आणि दैनंदिन जीवनासाठी दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात. याच कारणामुळे अधिक मायलेज देणाऱ्या कॉम्प्युटर बाईकची मागणी जास्त आहे. जर तुम्ही कमी किंमतीत बेस्ट मायलेजच्या बाईकच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला अशाच चार बाईक्सची माहिती देणार आहोत ज्या उत्तम मायलेज देतात आणि त्यांची किमतही जास्त नाही. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या बाईक्स…

कमी किमतीत जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक

TVS Sport

TVS स्पोर्टला बाजारात सर्वाधिक पसंती दिली जाते. या बाईकमध्ये १०९.७ सीसी BS6 इंजिन उपलब्ध आहे, जे ८.१८ bhp पॉवर आणि ८.७ NM टॉर्क जनरेट करू शकते. यात दोन ड्रम ब्रेक आहेत. बाजारात तुम्हाला ही बाईक तीन प्रकारात आणि सात रंगांमध्ये सहज मिळेल. त्यात १० लिटरची इंधन टाकीही उपलब्ध आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ६१,०२५ पासून सुरू होते आणि ६७,५३० पर्यंत जाते. हे ७०kmpl मायलेज देते.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

Hero Hf Deluxe

Hero HF Deluxe मध्ये ९७.२cc BS6 इंजिन मिळेल जे ७.९१bhp पॉवर आणि ८.०५Nm टॉर्क निर्माण करेल, त्याच्या पुढच्या आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. ही बाईक तुम्हाला ५ प्रकारात आणि १० रंगांमध्ये बाजारात मिळेल. यात ९.१ लीटरची इंधन टाकी मिळेल आणि या बाईकची एक्स-शोरूम किंमत ५५,०२२ ते ६७,१७८ पर्यंत आहे. याचे मायलेज ६५kmpl मिळेल.

(हे ही वाचा : Royal Enfield चा गेम होणार, दहा वर्षानंतर नव्या अवतारात येतेय तरुणांची आवडती बाईक, फुल टँकमध्ये धावेल ३०० किमी )

Honda SP 125

Honda SP 125 बाईकला १२४cc BS6 इंजिन मिळेल, जे १०.७२bhp पॉवर आणि १०.९NM टॉर्क निर्माण करते. याला समोर आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देखील मिळते. ही बाईक दोन प्रकारात आणि ५ रंगांमध्ये बाजारात उपलब्ध असेल. यात ११ लीटरची इंधन टाकी आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ८३,०८८ ते ६९,७०२ पर्यंत आहे. हे ६५kmpl मायलेज देते.

Honda Livo

होंडा लिवो तुम्हाला दोन प्रकारांमध्ये आणि ४ रंगांमध्ये बाजारात सहज मिळेल. यात १०९.५१cc BS6 इंजिन आहे, जे ८.६७bhp पॉवर आणि ९.३०Nm टॉर्क जनरेट करते. बाईकला एकत्रित ब्रेकिंग सिस्टमसह पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स मिळतात. या बाईकमध्ये ९ लीटरची इंधन टाकी उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७५,६५९ आहे. याचे मायलेज ६०kmpl मिळेल.

Story img Loader