TVS CNG 125cc scooter price: बाईकच्या दुनियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक अशी घटना घडली. जगातील पहिली सीएनजी बाईक बाजारात उतरवल्यामुळे बजाज ऑटोची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या या बाईकची दखल जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांनी घेतली आहे. दरम्यान, आता बजाजनंतर टीव्हीएसही लवकरच आपली पहिली सीएनजी दुचाकी ज्युपिटर 125 CNG सह बाजारात लाँच करणार आहे.

टीव्हीएस CNG 125cc स्कूटर

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

अलीकडील ऑटोकार इंडियाच्या अहवालानुसार, टीव्हीएस CNG च्या ज्युपिटर 125 वर काम करत आहे. यामुळे फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह सुसज्ज असलेली ही जगातील पहिली स्कूटर बनेल. अहवालात म्हटले आहे की, TVS गेल्या अनेक वर्षांपासून विविध पर्यायी इंधन तंत्रज्ञानावर काम करत आहे आणि त्यांनी आधीच CNG पर्याय विकसित केला आहे. अहवालात पुढे नमूद केले आहे की, ही स्कूटर २०२४ या वर्षाच्या शेवटी किंवा २०२५ च्या सुरुवातीला लाँच होऊ शकते. TVS ने दरमहा सुमारे एक हजार CNG स्कूटर्सची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

या सीएनजी स्कूटरचे तपशील अद्याप जाहीर केले नाहीत. मात्र, टीव्हीएस कंपनीचा संभाव्य खरेदीदारांना पेट्रोल, पूर्ण-इलेक्ट्रिक आणि CNG-चलित स्कूटरसह अनेक पर्याय ऑफर करण्याचा मानस आहे. टीव्हीएस सध्या १८% मार्केट शेअरसह तिसरी सर्वात मोठी दुचाकी कंपनी आहे आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी स्कूटर उत्पादक आहे.

फ्रीडम 125 प्रमाणे, ज्युपिटर 125 सीएनजी आणि पेट्रोल टाकीसह येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, याची किंमत रु. ९५,००० ते रु. १.१० लाख (एक्स-शोरूम) असू शकते. फ्रीडम 125 त्याच्या 2kg CNG टँकसह १०२ किमी/किलो CNG मायलेज देते.

हेही वाचा >> BMW R 1300 GSA: बीएमडब्ल्यूचं नवं मॉडेल लाँच; किंमत आणि फीचर्ससह सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर

बजाजने लाँच केली पहिली CNG बाईक

भारतीय कंपनी बजाज ऑटोने जगातली पहिली अशी सीएनजी बाईक अखेर लाँच केली. बजाजने एकूण तीन मॉडेल लाँच केले आहेत. हे तिन्ही मॉडेल बजेटमध्ये बसणार आहेत. यामध्ये सर्वात कमी ही 95 हजार रुपये किंमत आहे. बजाज फ्रीडम सीएनजी असं या बाईकचं नाव आहे. या बाईकची किंमत 95,000 (Ex-sh) असणार आहे. एकूण अशी तीन मॉडेल आहेत. यामध्ये फ्रीडम 125 NG04, फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी, फ्रीडम 125 NG04 ड्रम अशी मॉडेल आहेत. फ्रीडम 125 NG04 ची किंमतही १ लाख १० हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडीची किंमत १ लाख ५ हजार असणार आहे; तर फ्रीडम 125 NG04 ड्रमची किंमत ९५ हजार असणार आहे.

Story img Loader