नोकरी किंवा कामाशी संबंधित गोष्टी शोधण्यासाठी अनेक लोक लिंक्डइन या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मात्र हल्ली काही लोक त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि इतर गोष्टी शेअर करण्यासाठीही याचा वापर करू लागले आहेत. अशाच एका व्यक्तीने कार खरेदी केल्यानंतर लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली, जी आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हायरल होत असलेली ही पोस्ट मधुर सिंग नावाच्या यूजरने शेअर केली आहे.

मधुरने लिंक्डइनवर आपली कहाणी शेअर केली आणि शेवटी त्याने कोणत्याही कर्ज किंवा ईएमआयशिवाय कार कशी खरेदी केली हेही सांगितले आहे. आयुष्यातील ही मोठी गोष्ट सध्या केल्यानंतर त्याने आपल्या आधीची प्रेयसी, माजी बॉस आणि भाजी विक्रेत्याचे आभार मानले आहेत. त्याने असे का केले याचे कारणही त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय.

बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला अन्…; उत्तरप्रदेशातील ‘अजब प्रेम की गजब कहानी’

मधुरने लिहिले, “मी टाटा टियागो खरेदी केल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. संपूर्ण पेमेंट रोखीने केले. कोणतेही कर्ज घेतले नाही. ईएमआय केला नाही. मी बरीच वर्षे कार घेण्यासाठी पैसे वाचवत होतो. मी मित्रांसोबत पार्टीत गेलो नाही. मी माझ्या आधीच्या प्रेयसीसाठी आणि पत्नीसाठी कधीही महागड्या भेटवस्तू खरेदी केल्या नाहीत. माझ्या आई मला भाजी घ्यायला पाठवायची, तेव्हा मी भाजी विक्रेत्याकडून कोथिंबीर फुकट घ्यायचो, जेणेकरून मला गाडी घेण्यासाठी काही पैसे वाचता येतील.”

मधुरने पुढे लिहिले, “मी रात्री वॉचमन म्हणून अतिरिक्त शिफ्टमध्येही काम केले. मॅकडोनाल्डमध्येही काम केले. एवढेच नाही तर यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याही दिल्या.” त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी बचत करण्याच्या प्रत्येक संभाव्य पद्धतीचा वापर केला आणि शेवटी पैसे वाचवून कार खरेदी केली. मी माझे पालक, माझे सर्व माजी बॉस, आधीची आणि सध्याच्या मैत्रिणी आणि शेवटी सर्व भाजी विक्रेत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

linkedin madhur singh viral post
Photo : (LinkedIn)

मधुरने कारसोबत एक फोटोही दिला आणि लिंक्डइनवर शेअर केला. तथापि, सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्याची कथा व्यंग्यात्मक की गंभीर हे समजू शकले नाही. मधुरच्या या पोस्टला वीस हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. एका ट्विटर युजरने लिहिले, “काय, पत्नी आणि मैत्रीण?” दुसर्‍या युजरने लिहिले, “त्याने त्यांच्या बायोमध्ये ही पोस्ट गंभीरपणे न घेण्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. हे फक्त व्यंग्य आहे.”

Story img Loader