मारुती सुझुकीच्या ‘ग्रँड विटारा’ हा एसयुव्ही नुकतीच भारतात लाँच झाली. यापाठोपाठ आता टोयोटा किर्लोस्कर मोटरने अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच केली आहे. या दोन्ही गाड्यांचा एकत्र उल्लेख होत आहे कारण या दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये माइल्ड आणि स्ट्रॉंग हायब्रिड दोन्ही प्रकारचे इंजिन देण्यात आले आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा किर्लोस्कर या दोन्ही कंपन्यांनी मिळुन या गाड्यांच्या डिझाईन आणि टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे.
अर्बन क्रुझर हायरायडरच्या लाँचसह त्याच्या सर्व व्हेरीयंटच्या किंमतींचा खुलासा करण्यात आला आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत १०.४८ लाख तर टॉप व्हेरीयंटची किंमत १८.९९ लाख रुपये आहे. ही कार २८ किमी प्रति लीटर मायलेज देईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
Car Tips : कार नेहमी नव्यासारखी राहावी यासाठी वापरा ‘या’ टिप्स
सर्व व्हेरीयंटसची किंमत
- ई एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १०.४८ लाख रुपये
- एस एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १२.४८ लाख रुपये
- एसटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १३.४८ लाख रुपये
- जी एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १४.३४ लाख रुपये
- एस ई ड्राइव्ह २ डब्लूडी हाईब्रिड – १५.११ लाख रुपये
- जीटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १५.५४ लाख रुपये
- वी एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १५.८९ लाख रुपये
- वीटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १७.०९ लाख रुपये
- वी एमटी ऑल व्हील नियो ड्राइव्ह – १७.१९ लाख रुपये
- जी ई ड्राइव्ह २ डब्लूडी हाईब्रिड – १७.४९ लाख रुपये
- वी ई ड्राइव्ह २ डब्लूडी हाईब्रिड – १८.९९ लाख रुपये
ग्रँड विटारा आणि अर्बन क्रुझर हायरायडरचे सर्व फीचर्स जवळपास सारखे आहेत. दोन्ही गाड्या ४ मीटर म्हणजेच मिड साईझ एसयुव्ही मधील आहेत. ग्रँड विटाराची किंमत १०.४५ लाख रुपये आहे.