2023 Honda City Facelift Booking: होंडा कार आपल्या प्रिमियम सेडान कार Honda City ची फेसलिफ्ट आवृत्ती भारताच्या स्थानिक बाजारपेठेत लाँच करणार आहे. नवीन सेडानसाठी बुकिंग प्रक्रिया आधीच निवडक Honda डीलरशिपवर सुरू झाली आहे. कंपनीने हा फेसलिफ्ट अवतार डिझाइन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत अपडेट केला आहे, ज्याचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

2023 Honda City Facelift कधी लाँच होणार?

कंपनीने अद्याप या सेडानच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, ही कार मार्च २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात सादर केली जाऊ शकते.

(हे ही वाचा : Innova-Ertiga चा खेळ संपणार, मारुती आणतेय देशातील सर्वात सुरक्षित 7 सीटर कार, सेफ्टी फीचर्स पाहून व्हाल थक्क )

2023 Honda City Facelift बुकिंग सुरू

रिपोर्ट्सनुसार, Honda City चे फेसलिफ्ट लाँच होण्याआधी, Honda Cars च्या निवडक डीलरशिपवर तिची बुकिंग सुरु झाली आहे. या बुकिंगसाठी २० ते २५ हजार रुपये टोकन रक्कम घेतली जात आहे. तथापि, Honda City 2023 च्या प्री-बुकिंगबाबत Honda कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

2023 Honda City Facelift ची किंमत किती असेल?

या सेडानच्या किंमतीबद्दल Honda Cars कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु रिपोर्ट्सनुसार, ही प्रीमियम सेडान १२ ते १५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahead of its india launch soon select honda dealerships across the country have commenced bookings for the 2023 city facelift pdb