सध्या संपूर्ण जगामध्ये ज्या प्रकारे पेट्रोलची दरवाढ पाहायला मिळत आहे, यामुळे ई-व्हेईकल हा सर्वात चांगला प्रकार मानला जात असून ई व्हेईकलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच संपूर्ण जगामध्ये ई सायकलचा देखील ट्रेंड आला आहे. ई–सायकल बाजारातून घ्यायचयं म्हटलं तर खर्चही जास्त येतो, परंतु आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या सायकलला ई–सायकलमध्ये कमी पैशात कसे रुपांतर करता येईल याविषयी माहिती देणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पैसे वाया घालवण्यापेक्षा घरच्या घरी ५,९९० रुपयांमध्ये तुम्ही स्वतःची ई-सायकल बनवू शकता. कारण, बाजारात असे किट आले आहे, ज्यामुळे तुमची सायकल बटन दाबताच मोटारसायकलसारखी धावेल. त्यामुळे तुम्ही सायकलवर तुमचा जास्त अंतरावरचा प्रवास सहज पूर्ण करू शकता.

(हे ही वाचा: सिंगल चार्जमध्ये ५०० किलोमीटरहून अधिक धावणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार; अन् लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात )

बाजारात आले ‘हे’ किट

बाजारात एक किट आले आहे. जे तुमच्या सामान्य सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये बदलेल. तुम्ही तुमची जुनी सायकल घरी बसून इलेक्ट्रिक सायकलमध्ये बदलू शकता. या किटचे नाव ‘ALTER 24V Chain Drive Bicycle CONVERSION KIT’ आहे. हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट असून ते Amazon वर उपलब्ध आहे. ही किट फक्त ५,९९० मध्ये खरेदी केली जाऊ शकते, जी आजकाल सामान्य सायकलची किंमत आहे.

या स्केटमध्ये अनेक घटक दिलेले आहेत, जे तुम्हाला तुमच्या सामान्य सायकलमध्ये स्थापित करावे लागतील. एकदा हे घटक स्थापित केले की, हा प्रकार तुम्ही एकदा चार्ज करून सुमारे ३० किमी ते ४० किमीची रेंज सहज मिळवू शकता. हे पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे आणि तुम्ही फक्त काही रुपये खर्च करून बरेच अंतर कापू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alter 24v chain drive bicycle conversion kit electric conversion kit convert your old bicycle into an e cycle for rs 5990 pdb