Popular Car in Pakistan: पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महागाई विरोधात लढत आहे, दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पीठ, डाळ, तेल याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानचे परकीय चलन 3 अब्ज डॉलरच्या खाली आले आहे. पण आज आपण ना पाकिस्तानच्या महागाईबद्दल बोलणार आहोत ना तिथल्या महागड्या खाद्यपदार्थांबद्दल. आज आपण पाकिस्तानमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारबद्दल जाणून घेणार आहोत.

पाकिस्तानमध्ये ‘या’ कारला सर्वाधिक पसंती

पाकिस्तानमध्ये विकली जाणारी नंबर वन कार ही भारतीय कंपनीची कार आहे जी सर्वांना आश्चर्यचकित करते. वास्तविक, पाकिस्तान सुरुवातीपासून भारताचा शेजारी देश तसेच शत्रू देश आहे. भारत आणि पाकिस्तान अनेक वेळा एकमेकांशी लढले आहेत. यामुळेच भारतीय कंपनीचे नाव पाकिस्तानात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

(हे ही वाचा : डिजाइनपासून ते फीचर्समध्ये भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ‘ही’ कार अर्ध्याहून कमी किंमतीत घरी आणा )

‘या’ कंपनाची आहे कार

GTech हिंदीच्या अहवालात असे म्हटले आहे की, मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार पाकिस्तानमध्ये विकल्या जाणार्‍या पहिल्या पाच कारच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये ही कार सर्वाधिक विकली जाते. २०२२ मध्ये, जेव्हा पाकिस्तान महागाई आणि बेरोजगारीशी झुंजत होता, त्याच काळात या देशात अल्टोच्या ६६४२७ युनिट्सची विक्री झाली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कार खरेदी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. म्हणजेच तुम्ही अल्टो कार घेण्यासाठी तिथे गेल्यावर तुम्हाला लगेच डिलिव्हरी मिळत नाही, उलट तुम्हाला त्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते.

पाकिस्तानमध्ये अल्टोची किंमत भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त

भारतात ही मारुती सुझुकी अल्टो कार फक्त ३ ते ५ लाख रुपयांमध्ये मिळते आणि पाकिस्तानमध्ये ही कार १६ लाख रुपयांपासून सुरू होते. याची अनेक कारणे आहेत. वास्तविक, भारतीय रुपया पाकिस्तानी रुपयापेक्षा मजबूत आहे, त्यामुळे ही कार पाकिस्तानमध्ये महागड्या किमतीत उपलब्ध आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये कार वापरणाऱ्यांची संख्याही भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. गरिबीमुळे तेथील बहुतेक लोक बाईक किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे योग्य मानतात.

अल्टो नंतर ‘या’ कारला आहे पसंती

टोयोटाची कोरोला ही पाकिस्तानात सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार आहे. २०२२ मध्ये टोयोटाच्या कोरोलाने पाकिस्तानमध्ये २३,९६० युनिट्स विकल्या. ही कार १ लिटरमध्ये योग्य मायलेज देते. पाकिस्तानमध्ये या कारची किंमत ५० लाख रुपयांपासून सुरू होते. तर भारतात ते अतिशय स्वस्तात मिळते.

Story img Loader