मारूती सुझुकी भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. आतासुद्धा कंपनीने Alto K10 ची व्यावसायिक सिरीज म्हणून Alto K10 Tour H1 कारला भारतात लॉन्च केले आहे. पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. या कारच्या किंमतीबद्दल, इंजिन आणि स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजिन आणि गिअरबॉक्स

अल्टो के १० वर आधारित व्यावसायिक व्हर्जन म्हणून सादर करण्यात आलेल्या Tour H1 मध्ये कंपनीने १.० लिटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. कंपनीची ही नवीन हॅचबॅक कार पेट्रोल आणि फॅक्टरी फिटेड सीएनजी व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. पेट्रोल इंजिनमध्ये एका लिटरमध्ये ही कार २४.६० किमी मायलेज देते व सीएनजीमध्ये एका किलोमध्ये ३४.४६ इतके मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. पेट्रोल इंजिन ६६ बीएचपी आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करते. तर सीएनजी व्हेरिएंट ५६ बीएचपी आणि ८२ एनएम टॉर्क जनरेट करते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : बजाज प्लॅटिना, होंडा शाईनला टक्कर देण्यासाठी बाजारात लॉन्च झाली Hero ची ‘ही’ जबरदस्त बाईक, जाणून घ्या

सेफ्टी फीचर्स

नवीन Tour H1 मध्ये अनेक लेटेस्ट सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. मारूती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी (विक्री आणि विपणन) अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले, ”हे व्यावसायिक वाहन अल्टो के १० चा वारसा आणि विश्वासाला पुढे नेणार आहे. तसेच ते म्हणाले हे मॉडेल नेक्स्ट जनरेशन १० सी इंजिन (next-gen K 10C engine) सह येते. ज्यामध्ये अनेक आरामदायी सुविधा आणि सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.”

किंमत

(Image Credit- Financial Express)

Maruti Suzuki Alto K10 Tour H1 ला सिंगल ट्रिम मध्ये लॉन्च केले गेले आहे. जी सीएनजी आणि पेट्रोल या दोन व्हेरिएंमध्ये आहे. पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ४.८० लाख रुपये आहे. तर सीएनजी MT ५.७० लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत. ही कार मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे आणि आर्क्टिक व्हाइट या तीन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alto k10 tour h1 launch by maruti suzuki cng and petrol varient in 4 80 lkah price check features tmb 01
Show comments