अ‍ॅमेझॉनने कारसाठी नवा डॅशबोर्ड कॅमेरा लाँच केला आहे. Amazon.com Inc. च्या रिंग डिवीजनकडुन हा कारचा नवा कॅमेरा लाँच केला आहे. या डिवाइसकडुन कारच्या आतील आणि बाहेरील दोन्ही ठिकाणावरील रेकॉर्डिंग केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कॅमेऱ्यामध्ये सेन्सर देखील उपलब्ध होणार आहे ज्यामुळे गाडीच्या आजुबाजूला होणाऱ्या गोष्टींची सूचना केली जाते. यामुळे जर गाडीच्या बाजूला जर काही धोका असेल किंवा काही हालचाल असेल तर तुम्हाला त्याची कल्पना दिली जाईल. यासह या कॅमेऱ्यामध्ये कोणते फीचर्स जाणून घ्या.

फीचर्स:
मॉनिटरसह हे रिंग अ‍ॅपचा जोडता येते, ज्यामुळे लाईव्ह व्हिडीओ फीड पाहता येते. याबरोबर दोन बाजुने ऑडिओचा वापर करून बोलता येऊ शकते. गाडीतील ओबीडी 2 पोर्टमध्ये हा कॅमेरा प्लग इन करता येईल. स्टिकरद्वारे विंडशिल्डशी जोडता येईल. यामध्ये ७ तासांपर्यंतचे कॅमेरा फुटेज स्टोअर करता येऊ शकते. जे वायफायद्वारे फोनमध्ये सिंक करता येईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon launches a new dashboard camera for cars know its unique features pns