Air Taxi in America: पेट्रोल-डिझेल कारनंतर लोक इलेक्ट्रिक कारकडे वळू लागले. आता काही अमेरिकन कंपन्यांनी लोकांना एअर टॅक्सीद्वारे हवेत प्रवास करायला संधी देण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. अमेरिकेत अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या एअर टॅक्सीवर वेगानं काम करत आहेत. सामान्यतः ड्रोनसारखं तंत्रज्ञान किंवा लहान विमानासारखी असणारी ही एअर टॅक्सी वाहतूक कोंडी टाळण्यास आणि जलद प्रवास करण्यास मदत करते.

eVTOL विमानांचे फायदे

eVTOL विमानांचे सर्वांत मोठे फायदे म्हणजे ही विमानं लहान असतात आणि ती व्हर्टिकल टेक ऑफ व लॅंडिंग करू शकतात. पर्यावरणासाठीदेखील ती चांगली असतात. कारण- ती बॅटरीवर चालतात आणि त्यामुळे हवाही प्रदूषित होत नाही. त्याशिवाय मोठ्या शहरांमधील हवाई प्रवास कमी करण्यासाठी आणि वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

एअर टॅक्सी कंपन्या

जॉबी एव्हिएशन (Joby Aviation), लिलियम (Lilium) व आर्चर एव्हिएशन (Archer Aviation) यांसारख्या काही प्रमुख कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत आणि प्रवासी वाहतुकीच्या रूपात ते सादर करण्याची योजना आखत आहेत.

अमेरिकन लोकांचे मत काय?

एअर टॅक्सीवरील अलीकडच्याच एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की, ९८ टक्के अमेरिकन प्रवाशांना एअर टॅक्सी आवडते. हे सर्वेक्षण आर्चर एव्हिएशन व YouGov यांनी केलं होतं. हे सर्वेक्षण २,००० अमेरिकन नागरिकांवर करण्यात आलं होतं.

सर्वेक्षण काय सांगते?

या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ९८ टक्के अमेरिकन प्रवासी एअर टॅक्सीने प्रवास करण्यास तयार आहेत. त्याच वेळी ७९ टक्के अमेरिकन प्रवाशांचा असा विश्वास आहे की, हवाई टॅक्सी हा प्रवास करण्याचा एक सोईस्कर मार्ग आहे. ७६ टक्के अमेरिकन प्रवाशांचा असा विश्वास आहे की, प्रवास आणि पर्यावरणासाठी हवाई टॅक्सी सर्वोत्तम आहेत. त्यासोबतच ७५ टक्के अमेरिकन प्रवाशांचा असा विश्वास आहे की, एअर टॅक्सी हा प्रवास करण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे.