Amitabh Bachchan Car Collection: बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटांचा सुपरस्टार म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्ठीतील एक विख्यात सुपरस्टार कलाकार आहेत. अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटांचा सर्वात मोठा आणि प्रभावशाली अभिनेता मानलं जातात. लोक त्यांना ‘शतकाचा महानायक’ आणि त्यांना बिग बी, शहेनशाह असे म्हणतात. अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे आणि त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच ते कारवरील त्यांच्या आवडविषयी देखील ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्यांच्या ताफ्यात अनेक कारचा संग्रह आहे. चला तर पाहूया त्यांचे कार कलेक्शन….
मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण ११ लक्झरी ब्रँडच्या गाड्यांचा संग्रह आहे, ज्यात लेक्सस, रोल्स-रॉइस फॅंटम, २ बीएमडब्ल्यू, ३ मर्सिडीज यांचा समावेश आहे. अमिताभ यांच्या गॅरेजमध्ये वाहनांचा प्रचंड संग्रह आहे. तरीही, एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या कितीही कार किंवा SUV असले तरी, नेहमी एक खास कार असते जी व्यक्तीच्या हृदयात विशेष स्थान ठेवते. अमिताभ बच्चन यांच्याही हृदयात अशी एक कार आहे. जी त्यांच्यासाठी खास आहे.
(हे ही वाचा: बाकी कंपन्यांची उडाली झोप, ‘या’ देशी स्वस्त सात सीटर कारचा देशभरात जलवा, खरेदीसाठी लागल्या रांगा, मायलेज २६ किमी )
अमिताभ बच्चन यांच्या हृदयात ‘ही’ कार
अमिताभ बच्चन यांना त्यांचे जवळचे मित्र अनंत गोयंका यांनी Ford Prefect vintage कार भेट दिली होती. अनंतला माहित होते की, बच्चन कुटुंब फोर्ड प्रीफेक्ट गाडी चालवायचे आणि या कारचे अमिताभ बच्चन यांच्या हृदयात विशेष स्थान आहे कारण ही कुटुंबातील पहिली कार होती. ही कार मूळतः १९५० मध्ये खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी बच्चन कुटुंब उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे राहत होते. ही भेटवस्तू मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आभार व्यक्त केले होते. त्यांनी लिहिले, अनेकदा असे क्षण येतात. ज्यावेळी तुम्ही काहीच बोलू शकत नाही. तुम्ही निःशब्द होतात….मी आता झालो आहे…मी स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु, माझ्या मुखातून काही शब्दच बाहेर पडत नाहीत, असे अमिताभ बच्चन म्हणत भावूक झाले होते…ही पोस्ट सोशल मिडियावर खूप व्हायरल झाली होती.
अमिताभ बच्चन यांच्या ताफ्यात ‘या’ कार
अमिताभ बच्चन यांच्या गॅरेजमध्ये इतर अनेक गाड्या आहेत ज्यात Mercedes-Benz V Class, Bentley Continental GT, Land Rover Range Rover Autobiography, Toyota Innova Crysta, Lexus LX570, Mercedes-Benz S Class, Mini Cooper S, Toyota Are included. Includes Land Cruiser, आणि Audi A8L अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे.