महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांना नवीन महिंद्रा वाहने भेट देण्यासाठी अनेकदा चर्चेत असतात. आता त्यांनी बुद्धिबळ विश्वचषकात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या १८ वर्षीय आर प्रज्ञानंदला इलेक्ट्रिक SUV भेट देण्याची मोठी घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रांनी केलं ट्विट
आर प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. आनंद महिंद्रा यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ‘X’ (ट्विटर) वर ट्विट करून प्रज्ञानंदच्या पालकांना नवीन Mahindra XUV400 भेट देण्याची घोषणा केली. आनंद महिंद्रा यांनी राजेश जेजुरीकर, कार्यकारी संचालक आणि सीईओ (ऑटो आणि फार्म सेक्टर), महिंद्रा अँड महिंद्रा यांना त्यांच्या ट्विटमध्ये टॅग केले, जेणेकरून ते प्रज्ञानंद यांना नवीन वाहन भेट देण्याची त्यांची संकल्पना शेअर करू शकतील. प्रत्युत्तरादाखल, जेजुरीकर यांनी महिंद्रा XUV400 च्या स्पेशल एडिशनच्या डिलिव्हरीसाठी प्रज्ञानंद आणि त्यांच्या पालकांना पुष्टी दिली आणि त्यांचे अभिनंदन केले.
(हे ही वाचा : मारुतीच्या Baleno सह ‘या’ आठ लोकप्रिय कारची मागणी बाजारात थंडावली; पाहा यादी)
Mahindra XUV400 मध्ये काय आहे खास?
ही कार ३४.५ kWh आणि ३९.४ kWh अशा दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येतें दोन्हीमध्ये फ्रंट-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, जी १५०PS कमाल पॉवर आणि ३१०Nm पीक टॉर्क जनरेट करते. ३४.५ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक ३७५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. तर ३९.४ kWh बॅटरी पॅक ४५६ किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. या कारची किंमत १५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते ती १८.९९ लाख रुपयांपर्यंत आहे.