Anand Mahindra Ambassador price: सध्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात जुन्या वाहनांचे बिल व्हायरल होताना दिसत आहेत. जे पाहून लोकही आश्चर्यचकित होत आहेत. पूर्वीपेक्षा आता फार मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत आणि वस्तूंच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत, ज्या वस्तू पूर्वी १० ते २० हजारात येत होत्या. आज त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच कारविषयी माहिती देणार आहोत, ज्याचे जुने बिल पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आनंद महिंद्रा यांनी या Ambassador कारच्या किमतीचा एक फोटो शेअर केला, ज्यामुळे तो कारच्या किंमतीमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Ambassador कारचे जुने बिल होतेय व्हायरल

प्रत्येकांचीच आवडती कार ‘Ambassador’ आता पाहायला मिळत नाही पण ती त्या काळातील सर्वात आलिशान वाहनांमध्ये पाहायला मिळते. आजही लोकांना त्या कारचे राईड आणि अभिनेता हृतिकला खरेदी करायला आवडते. मात्र कंपनीने हे वाहन सध्या बंद केले आहे. १९५७ मध्ये हिंदुस्थान मोटर्सने ‘Ambassador’ कार बाजारात आणली होती. ही कार ब्रिटिश बेस्ड होती.

(हे ही वाचा : ‘या’ बाईकच्या पहिल्या सर्व्हिसिंगची किंमत SUV पेक्षाही जास्त, बिल पाहून तुमचेही डोळे चक्रावतील )

‘Ambassador’ कारची किंमत होती ‘इतके’ रुपये

या वाहनाने ८० च्या दशकात लोकांच्या हृदयावर राज्य केले, जरी नंतर त्याची लोकप्रियता कमी झाली आणि २०१४ मध्ये त्याचे उत्पादन पूर्णपणे बंद झाले. पण तुम्हाला माहित आहे का की लोकांच्या हृदयावर राज्य करणारी कार १९७२ साली फक्त १६,९४६ रुपयांमध्ये उपलब्ध होती. आता हे अनेक वर्षाेपूर्वीचे जुने बिल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्राने सांगितली त्यांच्या ‘Ambassador’ कारची किंमत

५० वर्षांपूर्वीचा हा दर २५ जानेवारी १९७२ चा आहे. ज्याची माहिती आता समोर आली आहे. जो महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे, हा दर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत, ज्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या ट्विटवर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या घरीही अम्बेसेडर कार ₹ १८००० ला विकत घेतल्याचे खूप आदराने सांगितले आहे.

Story img Loader