उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो. म्हणूनच त्यांनी केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसत्या पोस्ट करत नाही, संवादही साधतात. कधी कधी मजेशीर पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची पोस्ट चर्चेत आली आहे. आनंद महिंद्रा यांनी जीपची जाहिरात पोस्ट केली आहे. यात जीपची किंमत १२,४२१ रुपये लिहिली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. जीप ब्रँड फियाट क्रायल्सर मोटर्स (FCA) च्या मालकीचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा जीपची किंमत कमी करणारे पोस्टर शेअर केले असून या पोस्टमध्ये जीपची नवीन किंमत १२,४२१ रुपये सांगितली आहे. पण ही जाहिरात १९६० सालची आहे. जाहिरातीत लिहिले आहे की, महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या विलीज मॉडेल CJ-3B जीपमध्ये २०० रुपयांनी कपात करत आहे आणि आता या जीपची नवीन किंमत १२,४२१ रुपये आहे.

ही पोस्ट शेअर करताना महिंद्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक चांगला मित्र ज्याचे कुटुंब आमच्या वाहनांचे वाटप खूप दिवसांपासून करत आहे, त्यांनी त्यांच्या संग्रहातून ही (जाहिरात) काढून टाकली आहे. जुने दिवस खरंच चांगले होते…जेव्हा किमती योग्य दिशेने जात होत्या.” जीप CJ-3B चे उत्पादन १५ वर्षे (१९४९ ते १९६४ पर्यंत) करण्यात आले. १९६८ पर्यंत या मॉडेलच्या एक लाख ५५ हजार जीप विकल्या गेल्या होत्या. महिंद्रा यांच्या या ट्विटवर एका वापरकर्त्याने लिहिले की, “खूप चांगली किंमत. तरीही आम्ही याचा लाभ घेऊ शकतो का?” यावर महिंद्राने लिहिले आहे की, “आजच्या काळात तुम्हाला आमच्या कोणत्या अॅक्सेसरीज या रकमेत खरेदी करू शकता यावर हे मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे.”

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra tweet on jeep viral on social media rmt
Show comments