Anant Ambani and Radhika Merchant Car Collection: गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे. अखेर आज १२ जुलैला अनंत-राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या दोघांचे लग्न प्री-वेडिंग फंक्शनपासूनच चर्चेत आहे. अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. या कुटुंबाकडे अनेक उच्च श्रेणीतील आलिशान कार आहेत. त्यांचे कार कलेक्शन पाहून वाहनप्रेमींनाही भुरळ पडेल.

अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते. त्यांच्या जीवनशैलीप्रमाणेच त्याचे कार कलेक्शनही खूप आलिशान आहे. कारण ते भारतात उपलब्ध असलेल्या काही महागड्या कार चालवतात. येथे आम्ही तुम्हाला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कार कलेक्शनबद्दल सांगत आहोत. चला तर पाहूया यांच्या ताफ्यात कोणकोणत्या कार आहेत…

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं कार कलेक्शन पाहा

Bentley Continental GTC

अनंत-राधिका यांच्या ताफ्यातील सर्वात आलिशान कार बेंटले कॉन्टिनेंटल GTC आहे. ही आलिशान कार मुकेश आणि नीता अंबानी यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना एंगजेमेंट मध्ये भेट म्हणून दिली होती. या कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये ६.०-लिटर W१२ इंजिन आहे जे ६२६ bhp पॉवर आणि ८२० Nm टॉर्क जनरेट करते. जीटीसीची भारतातील किंमत ३.७१ कोटी रुपये आहे.

(हे ही वाचा : मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री )

Mercedez-Benz G63 AMG

या तरुण जोडप्यांकडे Mercedez-Benz G63 AMG गाडी आहे. ४.०-लिटर V८ इंजिन आहे. हे इंजिन ५७७ bhp पॉवर आणि ८५० Nm टॉर्क देते. या लक्झरी कारची एक्स-शोरूम किंमत ४ कोटी रुपये आहे.

Range Rover Vogue

प्रत्येक सेलिब्रिटीच्या गॅरेजमध्ये Range Rover असतेच आणि या जोडप्याकडे सुध्दा Range Rover Vogue आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत २.३८ कोटी रुपयांपासून सुरू होते. ही कार सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय आहे. रेंज रोव्हरमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय उपलब्ध आहे.

Mercedes-Benz S-Class

या यादीतील पुढील कार ही खास मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आहे. जे W२२१ मॉडेल आहे. सध्याच्या पिढीतील मर्सिडीज-बेंझ एस-क्लास ३६२ bhp पेट्रोल इंजिन किंवा २८२ bhp डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. एस-क्लासच्या एक्स-शोरूम किमती १.७६ कोटी रुपयांपासून सुरू होतात.

BMW i8

या हायब्रीड कारने बराच पल्ला गाठला आहे आणि BMW i8 त्याच्या आकर्षक डिझाइन आणि हायब्रीड इंजिनसह वेगळे आहे. BMW i8 ची एक्स-शोरूम किंमत २.६२ कोटी रुपये होती.

Story img Loader