अनिल अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी निर्मितीच्या उद्योगात उतरण्याची शक्यता आहे. कंपनीकडून त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी रिलायन्सकडून चीनच्या बीवायडी कंपनीचे भारतातील माजी कार्यकारी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने सुरुवातीला २.५ लाख गाड्यांच्या निर्मितीचं प्राथमिक लक्ष्य ठेवलं आहे. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ईव्ही प्लांट निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाची तसेच एकूण व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती आहे. या प्लांटद्वारे सुरुवातीला २.५ लाख गाड्यांच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे. पुढे जाऊन हे लक्ष ७.५ लाखांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तसेच सुरुवातीला या प्लांटची क्षमता १० गिगावॅट असेल, पुढे ही क्षमता ७५ गिगावॅटपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याची माहितीही रॉयटर्सच्या सुत्रांनी दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे याबाबत अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाने भाष्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, रॉयटर्सच्या वृत्तानुसार कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यावर बीवायडीचे माजी कार्यकारी अधिकारी संजय
गोपालकृष्णन यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.
अनिल अंबानी हे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ आहेत. मुकेश अंबानी यांच्या कंपनीनेही यापूर्वीच बॅटरी निर्मितीच्या उद्योगात प्रवेश केला आहे. त्यामुळे भविष्यात अनिल अंबानी यांच्या कंपनीला मुकेश अंबानी यांच्याकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी भारतात एकूण ४.२ दशलक्ष गाड्यांची विक्री झाली आहे. यापैकी २ टक्के गाड्या ईलेक्ट्रीक आहेत. सरकारने २०३० पर्यंत हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर योजनादेखील सुरु केल्या आहेत.