Apple Car: अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन, टॅबलेट, ईअरबड्स याबाबत तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आता अ‍ॅपल कंपनीची कार येणार असल्याचे म्हटल्यावर तरुणाईमध्ये या कारबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. ही अ‍ॅपलची कार मर्सिडीज, टेस्ला, GM हमर इव्ही आणि इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत स्वस्त असेल, असं सांगितले जात असून या अ‍ॅपल कारची मर्सिडीज, टेस्ला इतर इलेक्ट्रॉनिक सेडानशी टक्कर होणार आहे. आता नुकतीच या कारच्या लाँचिंगविषयी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅपल कारचे फीचर्स

अॅपलच्या कारमध्ये जबरदस्त हार्डवेअर, टॉप नोज सॉफ्टवेअर आणि जबरदस्त सिक्युरिटी फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच अॅपलची कार तुमच्या डिव्हाइसवरूनही ऑपरेट केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. मर्सिडीज आणि टेस्लाला टक्कर देण्यासाठी येणाऱ्या अॅपलच्या कारमध्ये अॅपल सिलिकॉन चिपसेट वापरण्यात येणार आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यातत आले आहे की, हा चिपसेट अॅपलच्या चार हाय-एंड MAC चिप्सच्या बरोबरीचा असेल. कंपनीचे सिलिकॉन अभियंते ते विकसित करतील. कंपनी कारच्या डिझाइनमध्ये काहीही वेगळे करणार नाही, कारमध्ये स्टीयरिंग व्हील आणि पेडल्स असतील.

(आणखी वाचा : Apple Car: आता फोननंतर जगभरात Apple कारचा डंका वाजणार; एलाॅन मस्कचं वाढलयं टेंशन )

अॅपल कार कधी होणार लाँच?
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कार काही देशांसाठी डिझाईन केली आहे. म्हणजेच ही संपूर्ण जगभर लाँच होणार नाही, कंपनी २०२६ मध्ये कार बाजारात सादर करू शकते, अशी शक्यता आहे.

अॅपल कारची किंमत

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कारची किंमत सुमारे एक लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ८० लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple car will be launched in 2026 the price of this car is likely to be around one lakh dollars around 80 lakh rupees pdb