Mahindra and Hyundai Cars Price Hike: सरकार वेळोवेळी वाहनांशी संबंधित नियम बदलत असते, तर अलीकडे म्हणजे १ एप्रिलपासून देशात कार्बन उत्सर्जनाचे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यानंतर अनेक वाहन निर्मात्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत, जिथे महिंद्रा आणि ह्युंदाईने त्यांच्या कारच्या किमती सर्वात आधी वाढवल्या आहेत. दुसरीकडे, ऑटोमेकर्सचे म्हणणे आहे की, कार्बन उत्सर्जन नियम लागू झाल्यानंतर, कारची इनपुट कॉस्ट वाढली आहे, कारण कारचे इंजिन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई) नुसार बनवावे लागते. त्यामुळे त्यांना कारच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत, अशा परिस्थितीत महिंद्रा आणि ह्युंदाईने त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.

महिंद्रा थारच्या नवीन किमती

महिंद्रा अँड महिंद्राने थारच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये २८,२०० रुपयांची वाढ केली आहे, तर थारच्या LX AT 2WD HT व्हेरिएंटच्या किमती अपरिवर्तित ठेवल्या आहेत. यासोबतच थारचे डिझेल २८००० रुपयांवरून ५६००० रुपयांपर्यंत वाढले आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Larvae found in oranges
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
A father's last advice before giving his heart to his son; A VIDEO that every father should show his coming-of-age child
“आयुष्यात पैसा, व्यसन…” मुलाला स्वत:चं हृदय देण्याआधी वडिलांचा शेवटचा सल्ला; वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO
Vijay Mallya Nirav Modi Assets Sales by ED
हजारो कोटींचा घोटाळा करून पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीकडून किती रुपये वसूल केले? संसदेत दिली माहिती
Friends fun on road caused accident of one of them brutal accident video viral on social media
असा मित्र नसलेलाच बरा! भररस्त्यात मित्राचा पाठलाग केला, वेगात गाडी आली अन्…, पुढच्या क्षणी जे झालं ते धक्कादायक, पाहा VIDEO

(हे ही वाचा : Hyundai Creta चे धाबे दणाणले, देशात येतेय अपघात रोखणारं ADAS सेफ्टी फीचरसह Midsize SUV )

Mahindra XUV 700 नवीन किमती

महिंद्राने आपल्या प्रीमियम SUV कार XUV 300 आणि XUV 700 च्या किमती देखील वाढवल्या आहेत, जिथे महिंद्राने XUV 700 च्या पेट्रोल व्हेरियंटच्या किंमती ५५९०० ते ७५१०० रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. यासोबतच महिंद्राने XUV 300 च्या पेट्रोल व्हर्जनच्या किमती १४,००० ते १६,००० रुपयांनी वाढवल्या आहेत.

Hyundai Creta च्या नवीन किमती

नवीन उत्सर्जन मानदंड लागू केल्यानंतर, Hyundai ने देखील आपल्या अनेक कारच्या किमती वाढवल्या आहेत, जिथे Hyundai ने Creta, Venue, Alcazar कारच्या किमती वाढवल्या आहेत. दुसरीकडे, जर आपण Creta च्या नवीन किमतींबद्दल बोललो तर त्याच्या कॉम्पॅक्ट SUV च्या किमती ३००० रुपयांनी वाढल्या आहेत. यासोबतच इतर Hyundai कारच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, TUCSON SUV ची किंमत सर्वात जास्त वाढवण्यात आली आहे, त्यानंतर या कारची किंमत २८.६३ लाख रुपयांऐवजी ३५.३१ लाख रुपयांपासून सुरू होईल.

Story img Loader