How Airbags Save our Lives : कोणतीही गाडी खरेदी करताना आपण सर्वात आधी कोणती गोष्ट पाहतो? सुरक्षा. सुरक्षित प्रवास करता येईल, हे आपले उद्दीष्ट असते. हल्ली मार्केटमध्ये आलेल्या सर्व गाड्यांमध्ये सुरक्षाशी संबंधित फीचर्स दिसून येतात. अनेक गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एअरबॅगचा उपयोग केला जातो. एअरबॅगच्या मदतीने रस्ते अपघातात लोकांचा जीव वाचू शकतो. तुम्हाला वाटेल, कसं काय? चला तर जाणून घेऊ या. (are airbags in your car how Airbags Save our Lives)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरबॅग कसे काम करतात?

तुमच्या गाडीमध्ये एअरबॅग आहे का? एअरबॅग हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खूप चांगले काम करते. गाडीमध्ये असलेले अनेक ऑन बोर्ड सेंसर्स गाडीच्या छोट्या मोठ्या हालचालींवर लक्ष ठेवतात. जेव्हा गाडी धडक देते तेव्हा हे सेंसर एअरबॅगला ट्रिगर करतात ज्यामुळे कोणताही अपघात झाला की लगेच एअरबॅग मोड्यूलच्या आत एक छोटा एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा स्फोट होतो आणि बॅगमध्ये हवा भरली जाते. गाडीच्या आत बसलेल्या लोकांना ही एअरबॅग सुरक्षा देते. त्यामुळे प्रत्येक गाडीमध्ये एअरबॅग असणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Ertiga, Carens चे धाबे दणाणले! एकेकाळी हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारी ‘ही’ कार नव्या अवतारात देशात दाखल होणार, किंमत…

एअरबॅग फुलल्यानंतर जेव्हा स्फोट होतो तेव्हा एक मोठा आवाज निर्माण होतो त्यानंतरच बॅगमध्ये हवा भरणे सुरू होते. गाडीच्या आत बसलेल्या लोकांना हा स्फोटचा आवाज ऐकू येत नाही कारण त्यांना गाडी जेव्हा धडक देते, त्याचा आवाज जास्त ऐकू येतो. जेव्हा एअरबॅग फुलते तेव्हा ती उशीप्रमाणे काम करते.

या एअरबॅगचा कोण फायदा घेऊ शकतात?

एअरबॅग जरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गाडीमध्ये वापरत असेल परंतू याला कारमध्ये अशाप्रकारे बसवली जाते की ज्या व्यक्तीने सीट बेल्ट लावले आहे, त्यांनाच या एअरबॅगचा फायदा घेता येते. जर तु्म्ही सीटबेल्ट लावला नाही तर तुम्हाला याचा फायदा घेता येणार नाही. त्यामुळे सीट बेल्ट लावणे खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ते द्रौपदी मुर्मूपर्यंत; भारतीय राष्ट्रपतींनी वापरलेल्या VVIP कारबद्दल जाणून घ्या सर्व काही

काही गाड्यांमध्ये सहा तर काही गाड्यांमध्ये सात एअरबॅग असतात. हे एअरबॅग पू्र्ण कारला कव्हर करू शकतात. या एअरबॅगच्या मदतीने अपघातादरम्यान गाडीमध्ये बसलेल्या लोकांच्या डोक्याला दुखापत होत नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are airbags in your car how airbags save our lives ndj
Show comments