भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. काही गाड्यांचं अपग्रेटेड मॉडेलही आणत असते. मारुती सुझुकी लवकरच एक नवीन कार लाँच करणार आहे. कंपनीने ग्रँड विटाराची झलक आधीच दाखवली असून बुकिंगही सुरू झाले आहे. ही कंपनीची मध्यम आकाराची एसयूव्ही असून जुलैमध्ये सादर करण्यात आली होती. मात्र, या कारचे अधिकृत लाँचिंग या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

मारुतीच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी ५३ हजाराहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे, या बुकींगमधील २२ हजार हे स्ट्राँग हायब्रिड व्हेरियंटसाठी आहेत. तथापि, माईल्ड-हायब्रीड व्हेरियंटसाठी बुकिंग मोठ्या प्रमाणावर आहे. या एसयूव्हीमध्ये तुम्हाला २८ किमीपर्यंत मायलेज मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

(हे ही वाचा : वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी; Maruti Grand Vitara ‘या’ महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार! )

कंपनीची पहिली हायब्रिड इंजिन कार
ग्रँड विटारा ही मारुती सुझुकीची पहिली कार असेल, जी हायब्रिड इंजिनसह येईल. याशिवाय, कंपनीची अशी दुसरी एसयूव्ही असेल, जी सनरूफ फीचरसह येईल. यापूर्वी कंपनीने नवीन ब्रेझामध्ये सनरूफ दिले होते. या कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड सारखे फीचर्स देखील कंपनीने दिले आहेत. तसेच, ग्रँड विटारामध्ये ३६० -डिग्री कॅमेरा उपलब्ध असेल. यामुळे ड्रायव्हरला कार चालवणे सोपे होणार आहे.नवीन बलेनो आणि ब्रेझा प्रमाणे यातही हेड-अप डिस्प्ले आहे.

मायलेजच्या बाबतीत पॉवरफुल
मारुतीची नवीन ग्रँड विटारा मायलेजच्या बाबतीतही चांगली असेल. रिपोर्टनुसार, ते २७.९७ किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देईल. कंपनीने दावा केला की एकदा टाकी भरली की ही एसयूव्ही १ हजार २०० किमी अंतर कापू शकते. म्हणजे दिल्लीत टाकी भरली तर कुठेही न थांबता थेट बिहारला जाता येते. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ग्रँड विटाराची माईल्ड-हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आली आहे. हे १४६२ सीसी के १५ इंजिन आहे जे ६,००० आरपीएमवर सुमारे १०० बीएचपी पॉवर आणि ४४०० आरपीएम वर १३५ एनएम टॉर्क जनरेट करते.

(हे ही वाचा : Electric Scooter Buying Tips and Tricks: इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं )

लाँचच्या वेळी किंमती जाहीर केल्या जातील
मारुतीच्या या एसयूव्हीची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण ग्रँड विटाराची अंदाजे किंमत ९.५ लाख रुपये (एक्स-शो रूम) असू शकते. मात्र, किंमतीबाबत स्पष्ट माहिती लाँच करतानाच कळेल. ही कार केवळ ११ हजार रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. कंपनीची ही कार उत्तम फीचर्सनी परिपूर्ण आहे.

Story img Loader