Ask these 7 Questions before purchasing a new car: कार खरेदी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी कंपन्या ग्राहकांपासून लपवतात किंवा त्यांना कमी प्राधान्य देतात. परंतु, ही माहिती ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची असू शकते आणि या माहितीचा त्यांच्या कारचे आयुष्य, देखभाल खर्च व पुनर्विक्री मूल्य या बाबींवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग कार खरेदी करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत हे जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. मायलेज (Fuel efficiency- Mileage)

कंपन्या अनेकदा त्यांच्या जाहिरातींमध्ये इंधन कार्यक्षमतेचे (चांगल्या मायलेजचे) दावे करतात, परंतु हे आकडे परिस्थितीवर आधारित असतात. खरे तर, रहदारी, रस्त्याची परिस्थिती आणि ड्रायव्हिंग शैली यासारख्या परिस्थितींमध्ये कार कमी मायलेज देऊ शकते. ग्राहकांना हे वास्तव समजत नाही आणि नंतर त्यांची निराशा होते.

२. देखभाल खर्च (Maintenance Cost)

देखभाल खर्चाची संपूर्ण माहिती कंपन्या देत नाहीत. ते वॉरंटी आणि विनामूल्य सेवेबद्दल सांगतात; परंतु प्रत्यक्षात काही पार्ट्स बदलण्याची किंवा दुरुस्तीची किंमत खूप जास्त असू शकते. कार खरेदी करताना ग्राहक या भविष्यातील संभाव्य खर्चाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना नंतर मोठ्या देखभालीच्या खर्चांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा… ड्रम ब्रेक की डिस्क ब्रेक! कोणत्या ब्रेकची बाईक घेणे आहे योग्य? वाचा अन् गोंधळ दूर करा

३. सर्व्हिसिंग आणि सुटे भाग यांची उपलब्धता (Availability of Servicing and spare parts)

सर्व्हिसिंगसाठी लागणारे सुटे भाग अनेकदा सहजपणे उपलब्ध होत नाहीत. काही मॉडेल्सचे सुटे भाग महाग किंवा दुर्मीळ असू शकतात आणि त्यामुळे सर्व्हिसिंगची किंमत आणि वेळ वाढू शकतो. ही गोष्टही कंपन्या ग्राहकांना सांगणे टाळतात.

४.सेफ्टी फीचर्सचे खरे महत्त्व (Importance of Safety Features)

कंपन्या सेफ्टी फीचर्सची भरपूर जाहिरात करतात; परंतु कोणते फीचर्स प्रत्यक्षात आवश्यक आणि कोणते फक्त मार्केटिंगच्या उद्देशाने गरजेचे आहेत ते सांगत नाहीत. उदाहरणार्थ, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) आणि एअरबॅग्ज यांसारख्या मूलभूत सेफ्टी फीचर्सबद्दल ते सांगत नाहीत.

५. वॉरंटी (Warranty)

कंपन्या वॉरंटीच्या कालावधीवर भर देतात; परंतु त्यात काय समाविष्ट आहे याबद्दल ते स्पष्टपणे सांगत नाहीत. वॉरंटीमध्ये अनेकदा बऱ्याच पार्ट्स आणि सर्व्हिसिंगच्या सुविधेचा समावेश नसतो, जे ग्राहकांना माहीत नसते आणि नंतर त्यांना अनपेक्षित खर्चाला सामोरे जावे लागते.

६. पुनर्विक्री मूल्य (Resale value)

काही मॉडेल्सची रीसेल व्हॅल्यू इतर कारच्या तुलनेत कमी असू शकते आणि ही बाब कंपन्या उघड करीत नाहीत. तुम्ही खरेदी करीत असलेल्या कारची भविष्यातील पुनर्विक्री किंमत काय असेल हे जाणून घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे. कारण- या बाबीचा गुंतवणुकीच्या एकूण खर्चावर परिणाम होतो.

७. ऑन-रोड किमतीमध्ये लपवलेली किंमत (Hidden charges in on-road price)

बऱ्याचदा कंपन्या फक्त एक्स-शोरूम किंमत सांगतात; पण ऑन-रोड किमतीमध्ये रोड टॅक्स, विमा आणि इतर लॉजिस्टिक शुल्क यांसारखे इतर विविध शुल्कदेखील समाविष्ट असते. हे छुपे शुल्क कारच्या एकूण खर्चात लक्षणीय वाढ करू शकतात.

हेही वाचा… तुमच्या गाडीकडून मिळतेय सर्वांत कमी मायलेज? मग आताच टाळा ‘या पाच चुका’

ही माहिती लपविण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपन्यांना त्यांचे उत्पादन अधिक आकर्षक बनवायचे असते. त्यामुळे ग्राहकांनो तुम्ही कार खरेदी करण्यापूर्वी या सर्व बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि त्याबद्दल कंपनीकडून संपूर्ण माहिती विचारून घेणे आवश्यक आहे. मग त्या आधारे तुम्ही सारासार विचार करून, योग्य तो निर्णय घेऊ शकाल आणि भविष्यात कोणत्याही अनपेक्षित खर्च आणि त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ask these 7 questions before purchasing a new car companies hides some important information to customer while buying new vehicle dvr