एथर एनर्जी ही देशातील पहिली इंटेलीजेंट इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक आहे. नव्या एथर 450X मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग, नेव्हिगेशन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे उत्तम फीचर्स आहेत. मात्र, स्कूटरच्या लूकमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. नवीन Ather 450X त्याच्या जुन्या मॉडेल 450 पेक्षा अनेक बाबतीत वरचढ आहे. यात मोठा बॅटरी पॅक, अधिक पॉवर आणि चांगली क्षमता आहे. एथर 450X ची बॅटरी २.९ KWH ची आहे. ही इलेक्ट्रिक मोटर ८ बीएचपी पॉवर जनरेट करते. जुन्या मॉडेलपेक्षा ०.८ बीएचपी जास्त आहे. तसेच, त्याचे वजन जुन्या मॉडेलपेक्षा ११ किलो कमी आहे आणि त्याचा टॉप स्पीड देखील ताशी ८५ किमी इतका वाढला आहे. 450X फक्त ३.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. एथऱ 450X मध्ये दोन राइडिंग मोड आहेत. ते एका पूर्ण चार्जवर इको मोडवर ११६ किमी आणि राइड मोडवर ८५ किमी अंतर कापू शकते.

एथर एनर्जी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादमध्ये १० जलद चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यासाठी कंपनीने ईईएसएलसोबत भागीदारी केली आहे. एथर एनर्जीच्या मते, हे चार्जिंग स्टेशन मॉल, स्टेशन, रेस्टॉरंट, टेक पार्क आणि कॅफेच्या आसपास बसवले जातील. एथर एनर्जीच्या १८ शहरांमध्ये १२८ हून अधिक चार्जिंग स्टेशन्स आधीच अस्तित्वात आहेत.

Whatsapp Payment ला मिळाली महत्त्वाची मान्यता; आता ४ कोटी युजर्संना सेवा देण्यासाठी सज्ज- रिपोर्ट

कंपनीने 450X दोन नवीन रंगांसह (मॅट ग्रे आणि मिंट ग्रीन) लाँच केले आहे. तुम्हाला एथर एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी घ्यायची असेल, तर तुम्ही कंपनीच्या https://www.atherenergy.com/ वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम दिल्ली किंमत १,३२,४२६ रुपये आहे. ही किंमत एथर 450X वर उपलब्ध FAME-2 अनुदानानंतरची आहे. तसेच इतर राज्यांमध्ये त्याची किंमत किंचित बदलू शकते.

Story img Loader