दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळं अनेकांना कार खरेदी करण्याची इच्छा होते. घरातील चिमुकल्यांपासून थोरांपर्यंत आमच्या कुटुंबातील सदस्य असा अभिमान प्रत्येकाला वाटतो. पण एखादी निर्जीव वस्तुही अनेकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वाटते. घरातील आर्थिक घडी मजबूत झाली की, अनेक जण कार खरेदी करण्याचा विचार करतात. सोशल मीडियावर न्यू फॅमिली मेंबर असं कॅप्शन देऊन कारचे फोटो शेअर करून आनंदही व्यक्त करतात. पण सामान्य माणूस त्याची आर्थिक परिस्थिती बघून कार खरेदी करतो. बजेटच्या बाहेर कारची किमत असल्यावर तो अनेकदा विचारंही करतो. आता असाच काहिसा विचार कार खरेदी करणाऱ्या काहींना करावा लागणार आहे. कारण जर्मन लक्झरी कार मॅन्युफॉक्चरिंग कंपनी ऑडीने कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केलीय. तसंच मारुती कंपनीनेही कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑडी कारच्या किमती १ जानेवारी २०२३ पासून वाढवल्या जाणार आहेत. भारतात उपलब्ध असलेल्या ऑडी कंपनीच्या सर्व कारच्या किमती १.७ टक्क्यांनी वाढणार आहेत. कारच्या मागणीची समस्या आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्यामुळं काही अडचणींना सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे कारच्या किमती वाढणार आहेत, असं कारण कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. एच टी ऑटोच्या एका रिपोर्टनुसार ऑडीचे भारतातील प्रमुख बलबीर सिंग ढिल्लो यांनी म्हटलं की, कारच्या मागणीत होणारी समस्या आणि ऑपरेशन कॉस्ट वाढल्यामुळं कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ग्राहकांची पूर्णपणे काळजी घेत आहोत.
नक्की वाचा – चोरट्यांपासून सावधान! तुमची कार हॅक करून लांबूनच करतील स्टार्ट, कसं ते वाचा सविस्तर
या गाड्यांच्या किमती वाढणार
ऑडी A4,A6, AB L, Q3,Q5, Q7, Q8, S5 sportback, RS5 Sportback, RQS8, E Tron50, E Tron 55, E Tron Sportback55, E Tron GT, RS E Trot GT या कार्सच्या किमती वाढणार आहेत. इ ट्रॉन मध्ये चार नवीन इलेक्ट्रिक मॉडल ऑडी कंपनीने लॉंच केले आहेत. कंपनीकडून Q8 ई-ट्रॉन भारतात विक्रि केलेली पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही असणार आहे. या सर्व मॉडेलमध्ये नवीन बॅटरी पॅक आणि डिझाईन असणार आहेत.
मारुतीनेही केली घोषणा
मारुती कंपनीनेही किंमती वाढवण्याची घोषणा केलीय. या कंपनीकडून कोणत्या तारखेला किमती वाढणार आहेत, याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलं नाही. मारुती सुझुकीच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात त्यांच्या कंपनीतील कार्सच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. कारच्या मागणीतील समस्यांच्या कारणामुळं किंमती वाढणार असल्याचं मारूतीकडूनही सांगण्यात आलं आहे.