Audi Changed Its Popular Four Ring Logo: लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जर्मन कार उत्पादक ऑडीने चीनमध्ये आपला आयकॉनिक फोर-रिंग लोगो बदलला आहे. याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. काहीच दिवसांपूर्वी जग्वारनेही आपल्या कंपनीचा आयकॉनिक लोगो तब्बल १०२ वर्षांनी चेंज केला. यानंतर आता आडीनेही आपला लोगो बदलला. हा लोगो १९३० पासून लक्झरी कारचे प्रतीक आहे. पण हा लोगो नवीन E कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक स्पोर्टबॅकचा भाग नाही. जे या महिन्याच्या सुरुवातीला शांघायमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. गाडीच्या पुढच्या बाजूला सर्व अक्षरात ‘AUDI’ लिहिले आहे. जग्वारच्या नवीन लोगोने सोशल मीडियावर नुकतीच खळबळ उडवून दिली असताना आता ऑडीने हे पाउल उचलले आहे.
चीनच्या बाजारात ऑडीने ई कॉन्सेप्ट स्पोर्ट्सबॅक कार उतरवली आहे, तिच्यावर हा लोगो गायब असून केवळ ‘AUDI’ अशी इंग्रजी अक्षरे दिसत आहे. नवीन AUDI लोगो जगातील सर्वात मोठ्या ऑटो मार्केटमध्ये तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बदलला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.चीनी वाहन निर्मिती कंपनी SAIC सोबत को- डेव्हलप केलेल्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी हा लोगो बदल केलेला आहे.चार बांगड्या ( रिंग ) अर्थ काय ? १९३२ मध्ये जर्मनीच्या चार प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांचे विलीनीकरण झाले होते. त्यानंतर Auto Union AG नावाचा नवा समुह तयार झाला. या चार कंपन्यांचे प्रतिक हा ऑडीचा चार रिंगाचा लोका आहे. या चार कंपन्या खालील प्रमाणे आहेत. Audi, DKW, Horch, Wanderer
ऑडी आणि SAIC या दोघांनीही चीनमधील बाजारपेठेतील वाटा परत मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
हेही वाचा >> Jaguar new logo: जग्वारने १०२ वर्षांनंतर लाँच केला नवीन लोगो; आधीच्या आणि आत्ताच्या लोगोमध्ये काय बदल?, जाणून घ्या
प्रत्येक रिंग एका कंपनीचे प्रतिनिधीत्व करते.या कंपन्याचे विलीनीकरण त्यावेळच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आणि जर्मनीच्या ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मजबूत करण्यासाठी केले होते. हे चार रिंग समानता, एकता आणि भागीदारीचे प्रतिक आहे. हा लोगो दर्शवितो की कशा चार कंपन्या मिळून एका बड्या उद्योग समुहात परिवर्तित झाली. हा लोगो ब्रॅंडची ताकद आणि गुणवत्ता देखील दाखवतो. आज ऑडीचा लोगो ब्रॅंडच्या लक्झरी, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचे प्रतिक बनला आहे. हा लोगो जगातला सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या लोगो पैकी एक आहे.