Audi Q8 e-tron bookings open: जर्मन कार निर्माता ऑडीने १० ऑगस्ट २०२३ पासून भारतात नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉनचे बुकिंग सुरू केले आहे. नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉन या इलेक्ट्रिक रेंजमधील नवीन डिझाइन केलेल्या कार आहेत. नवीन फीचर्ससोबतच त्याची बॅटरी क्षमताही खूप जास्त आहे. या दोन्ही कार अधिक रेंज आणि ड्रायव्हिंगचा आनंददायी अनुभव देतात. एकदा चार्ज केल्यानंतर ते ६०० किमीची रेंज देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉनची बुकिंग १० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ह्या कार ग्राहक ५,००,००० रुपयांमध्ये बुक करू शकतात. अधिकृत वेबसाइट किंवा शोरूमद्वारे बुकिंग केले जाऊ शकते. दोन्ही मॉडेल्स भारतात लवकरच लाँच होतील. त्यानंतरच किंमत जाहीर करण्यात येणार आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले की, “आम्ही आमची नवीन इलेक्ट्रिक वाहने ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉन काही दिवसांत लाँच करणार आहोत. या कार काही महिन्यांपूर्वीच जगभरात लाँच करण्यात आल्या होत्या. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नवीन डिझाइन, अधिक बॅटरी क्षमता आणि रेंजसह इतर अनेक फिचर्ससह सुसज्ज उत्कृष्ट कार आणल्या आहेत.”

(हे ही वाचा : Punch पाहतच राहिली, देशातल्या सर्वात लहान SUV ची धूम; ३० दिवसात ५० हजारापेक्षा अधिक लोकांनी केली खरेदी )

ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन सुधारित वायुगतिकी, चांगले चार्जिंग कार्यप्रदर्शन आणि वाढीव बॅटरी क्षमतेसह येतात. त्याची रेंज एसयूव्हीमध्ये ५८२ किमी आणि स्पोर्टबॅकमध्ये ६०० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. कारच्या पुढील भागामध्ये बदल करण्यात आले आहेत. क्यू८ मॉडेलचे नाव ऑडीच्या इलेक्ट्रिक कार मॉडेलच्या सगळ्यात वरती आहे.

नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन नऊ एक्‍सटीरियर कलर ऑप्शनमध्ये पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मडेरा ब्राउन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मायथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे यांचा समावेश आहे. कारच्या इंटिरिअर भागात, नवीन क्यू८ ई-ट्रॉन ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये लाँच केले जाईल.

ग्राहकांना नेहमी लक्षात ठेवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून, ऑडी इंडियाने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी मायऑडीकनेक्ट अ‍ॅपवर चार्ज माय ऑडी पर्यायाच्या रूपात उद्योगातील पहिला उपक्रम लाँच केला आहे. हे वन स्टॉप सोल्यूशन आहे जेथे ऑडी ई-ट्रॉनच्या ग्राहकांना एकाच अ‍ॅपवर एकाधिक वाहन चार्जिंग भागीदारांना प्रवेश मिळेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audi india has announced that bookings are open for the new q8 e tron for a token amount of rs 5 lakh pdb