ऑडी इंडियाने नवी Q7 लिमिटेड एडीशन भारतात लाँच केली आहे. या लिमिटेड एडीशन एसयुव्ही ट्रिमला टेक्नॉलॉजी व्हेरीएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या नव्या एडीशनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. ही कार बैरिक ब्राऊन रंगात देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात या एसयुव्हीचे फक्त ५० युनिट्स विकले जाणार आहेत. नव्या सील ट्रिमबरोबर ही एसयुव्ही लाँच करण्यात आली आहे. यात ४८.२६ सेमी (R१९) ५-आर्म स्टार स्टाइल डिझाइन अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ आणि हाय-ग्लॉस स्टाइलिंग पॅकेज उपलब्ध आहे.

आणखी वाचा : दिवाळीआधी नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडयांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

या कारची किंमत ८८.०८ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे. ही नवीन एसयुव्ही रॅपराउंड कॉकपिट डिझाइनसह उपलब्ध आहे. हे ४८V माईल्ड-हायब्रिड सिस्टमसह ३.० लिटर V6 TFSI इंजिन उपलब्ध आहे. ही कार ३४० bhp पॉवर आणि ५०० ​​Nm टॉर्क जनरेट करते. या कारचा टॉप स्पीड २५० किमी/तास आहे. विशेष म्हणजे ५.९ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडू शकते.

क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह, अडॅप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह सात ड्राइव्ह मोड्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएंसी ऑफ-रोड, ऑल-रोड या सुविधा उपलब्ध आहेत. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, “नवीन ऑडी Q7 सह, आम्ही आमच्या ग्राहकांना सणांच्या दिवसात कार खरेदी करण्यासाठी एक नवीन पर्याय देऊ इच्छितो. ऑडी Q7 चे विशेष परफॉर्मन्स क्वालिटी या कारला इतर सर्व वाहनांपेक्षा वेगळी आणि उत्तम सिद्ध करते.

आणखी वाचा : गाडीमध्ये अडकल्यावर बाहेर कसे पडायचे? जाणून घ्या अशावेळी काय करता येईल

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audi q7 limited edition launched in india know price and features pns