Driving Tips In Monsoon :  पावसाळ्यात कारच्या विंडस्क्रीनवर वाफ जमा होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कार चालविणे कठीण होऊन जाते. यावेळी कारमध्ये एअर कंडिशनरचा (एसी) योग्य रीतीने वापर करणे महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही कारचा एसी नीट वापरला नाही, तर तुमच्या कारच्या विंडस्क्रीनवर जास्त वाफ जमा होऊ लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडीच्या विंडस्क्रीनवर जास्त वाफ जमा झाल्यास पुढचा रस्ता दिसणे कठीण होऊन जाते. अशा वेळी अनेकजण वारंवार कापडाने ते स्वच्छ करतात. मात्र अस करताना अपघाताची भीती असते. कारण कार चालवत असताना विंडस्क्रीनची आतील बाजू कापडाने स्वच्छ करताना लक्ष विचलित झालं, तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला पावसात कारमधील एसी वापरण्याची योग्य अशी पद्धत सांगणार आहोत. (Monsoon car driving tips)

पावसाळ्यात गाडी चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी (4 Safety Tips for Driving In Rainy Season)

१) डीफॉग मोड वापरा

बहुतेक कारमध्ये डीफॉग मोड असतो; जो विंडस्क्रीनमधून वाफ काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेला असतो. या मोडमध्ये एसी आणि हीटर, अशा दोन्ही सुविधांची व्यवस्था केलेली असते. हा मोड हवा कोरडी करून, विंडस्क्रीनमधून वाफ काढून टाकण्यास मदत करतो.

More Stories On Car Driving Tips : पावसाळ्यात सुरक्षित वाहन चालविण्यासाठी फॉलो करा फक्त ‘या’ पाच टिप्स; अपघात होण्याची चिंता नाही

२) एअर कंडिशनर वापरा

पावसाळ्यात गाडीच्या इनडोअर ग्लासवरही वाफ साचू लागते. ही वाफ तुम्ही कापडानं पुन्हापुन्हा स्वच्छ करता. पण असे करणे चुकीचे आहे, अशा परिस्थितीत कारमधील AC चालू करा. तो कूल मोडवर सेट करा आणि व्हेंट्स विंडस्क्रीनकडे डायरेक्ट करा. त्यामुळे हवा कोरडी करून, विंडस्क्रीनमधून वाफ काढून टाकण्यास मदत करील.

३) रीसर्क्युलेशन मोड बंद करा

कारमधील रीसर्क्युलेशन मोड बंद ठेवा; जेणेकरून ताजी हवा येऊ शकेल आणि ओलावा बाहेर जाऊ शकेल. रीसर्क्युलेशन मोड स्टीम आणखी वाढवू शकतो. कधी कधी विंडस्क्रीनमधून वाफ काढून टाकण्यासाठी हीटरदेखील वापरला जाऊ शकतो. ते विंडस्क्रीनच्या दिशेने डायरेक्ट करा; जेणेकरून गरम हवा ओलावा काढून टाकू शकेल.

पंपावर पेट्रोल, डिझेल भरताना घ्या काळजी, अन्यथा तुमच्याबरोबरही होऊ शकते ‘अशी’ फसवणूक

४) विंडो थोडी ओपन करा

जर कारमध्ये जास्त वाफ जमा होत असेल, तर तुम्ही कारच्या विंडो थोड्याशा उघडू शकता; जेणेकरून हवा आत-बाहेर होऊ शकेल. त्यामुळे वाफदेखील कमी होऊ शकते. विंडस्क्रीनवर डिफ्रॉस्टर स्प्रे वापरा. हा स्प्रे वाफ कमी करण्यास मदत करतो आणि आपल्याला समोरचे स्पष्ट दिसते. या टिप्स फॉलो करून, तुम्ही पावसाळ्यात तुमच्या कारच्या विंडस्क्रीनवर जमा होणाऱ्या वाफेचा सामना करू शकता आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto and car tips fog on car windscreen steam forming on the car windscreen during rainy season thisis the right way to use as sjr
Show comments