Cars Price Hike: तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर आताच करा. कारण, अनेकांच्या आवडत्या कंपनीची कार आता महाग होणार आहेत. ऑटो कंपनी Hyundai येत्या वर्षात आपल्या कारच्या किमतीत वाढ करणार आहे. भारतातील कारच्या विविध मॉडेल्सवरील किंमतीत वाढ करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
वाढ करण्याचे कारण?
कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ कारच्या किंमतीतील गाडी उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात वाढ झाल्याने ही वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ नव्या वर्षात म्हणजेच २०२३ पासून लागू होणार असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.
(हे ही वाचा : Flashback 2022: ‘या’ आहेत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV कार; मायलेजच्या बाबतीत आहेत दमदार)
ह्युंदाईच्या कोणत्या कारची किंमत किती वाढणार आहे, याची माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पण वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किमतींमध्ये होणारी वाढ वेगळी असेल, असे कंपनीने सांगितले आहे.