Auto Expo 2023: ११ जानेवारीपासून सुरु झालेल्या Auto Expo २०२३ १३ तारखेपासून सामान्य नागरिकांना प्रवेश सुरु झाला आहे. हा शो १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. हा शो उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये सुरु आहे. या शो मध्ये अनेक कंपन्यांनी आपले कार्स , बाईक्स , बसचे मॉडेल्स लाँच केले. हा आशियामधील सर्वात मोठा ऑटो शो आहे. या शो मध्ये दोन दिवसांत तब्बल ८२ गाड्या लाँच झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शोची थीम सुरक्षित, स्वच्छ आणि हरित, पर्यावरणपूरक तसेच भविष्यातील वाहनांचे लाँचिंग करण्यात आले. यामध्ये सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलवर चालणाऱ्या व हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे लाँचिंग करण्यात आले. या सर्वांमध्ये वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा सगळ्यात जास्त भर हा इलेक्ट्रिक वाहनांवर दिसला. या शोचे मुख्य आकर्षण हे बॉलिवूडचे अभिनेते हे असतात. मात्र यावेळी शाहरुख खान शिवाय कोणीही तिथे उपस्थित राहिले नाही.

हेही वाचा : Auto Expo 2023: जबरदस्त पॉवर रेंजसह Ultraviolette ची बाईक घालणार देशात धुमाकूळ; जबरदस्त फीचर्स पाहून व्हाल थक्क

या कंपन्यांनी घेतला समावेश

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक कंपन्या सामील झाल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, एमजी मोटर, व्हज कॉटन, जेबीएम, अशोक लेलँड, व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स, ह्युंदाई, किया, बीवायडी, कमिन्स, टोयोटा, लेक्सस, अतुल ऑटो, मॅटर मोटरवर्क्स, टॉर्क मोटर्स, बननेली, कीवे, मटा, टाटा मोटर्स या कंपन्या सामील झाल्या होत्या. तसेच हेक्साल मोटर्स , सन मोबिलिटी, ओमेगा मोबिलिटी. ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी, वॉर्ड विझार्ड इनोव्हेशन्स, एमटीए ई-मोबिलिटी , MotoVoit Mobility, Godavari Electric Motors, Ultra Violet, Praveg इत्यादी कंपन्यांनी समावेश घेतला होता. विशेष म्हणजे, अशोक लेलँडने पाच वाहने आणि जेबीएमने दोन इलेक्ट्रिक बसेस सादर केल्या आहेत.

हेही वाचा : Auto Expo 2023: टाटाची Sierra EV येणार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्वरूपात; जाणून घ्या अधिक खासियत

या कंपन्यांनी समावेश घेतला नाही

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये महिंद्रा, फोक्सवॅगन,स्कोडा , ऑडी , मर्सिडीज , बीएमडब्ल्यू , जीप, सिएट्रोन, वोल्वो , निसान, रेनॉल्ट , हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल आणि स्कुटर इंडिया , रॉयल एन्फिल्ड , टीव्हीएस मोटर या कंपन्यांनी समावेश घेतला नाही. अमेरिकन कामपणी असणाऱ्या हार्ले डेव्हिडसननेही आपली वाहने प्रदर्शित केली नाहीत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto expo 2023 82 cars were launched by various companies in two days tmb 01
Show comments