Auto Expo 2023 First Day Highlights: देशातील सर्वात मोठा शो ऑटो एक्स्पो 2023 ला ११ जानेवारीपासून धूमधडाक्यात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी एकापेक्षा एक जबरदस्त गाड्या देशात सादर झाल्या आहेत. ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्याच दिवशी ५९ हून अधिक वाहनांचे अनावरण करण्यात आले असून या कंपन्यांमध्ये भारताशिवाय जगातील सर्व देशांतील कंपन्या सामील होत्या. चला तर जाणून घेऊया कोणत्या गाड्यांचा वाजला डंका.
ऑटो एक्स्पो २०२३ पहिल्या दिवसाची ठळक वैशिष्ट्ये
जर तुम्ही पहिल्या दिवशी ऑटो एक्स्पोला जाऊ शकला नाही, तर येथे जाणून घ्या की कोणत्या वाहन निर्मात्याने कोणते वाहन लाँच केले किंवा प्रदर्शित केले आहे.
Maruti Suzuki
मारुती सुझुकी इंडियाने 2023 ऑटो एक्सपोमध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने डिझाइन केलेली आणि विकसित केलेली मारुती सुझुकी eVX संकल्पना इलेक्ट्रिक SUV चे अनावरण केले. ही SUV पूर्णपणे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर बनवली आहे.
MG Motors
MG Motors ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये नेक्स्ट-जेन हेक्टरची किंमत जाहीर केली, जी कंपनीने १४.७२ लाखांच्या प्रारंभिक किंमतीसह बाजारात लाॅंच केली आहे.
Greaves Cotton
ग्रीव्स कॉटनने सहा नवीन इलेक्ट्रिक वाहने सादर केली आहेत ज्यात दोन दुचाकी आणि तीन तीन चाकी वाहने आहेत. यासोबतच कंपनीने अँपिअर प्राइमस ही हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे. कंपनीने पॅन इंडियासाठी या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग विंडो उघडली आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: 6 एअरबॅग आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या Hyundai च्या ‘या’ फेसलिफ्टचे बुकिंग सुरु; किंमत… )
JBM Auto
JBM Auto ने JBM GALAXY लाँच केला, जो भारतातील पहिला स्वदेशी विकसित आणि निर्मित १०० टक्के इलेक्ट्रिक लक्झरी कोच आहे.
Hyundai Motor India
Hyundai Motor India Limited ने ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्या दिवशी ऑल-इलेक्ट्रिक SUV IONIQ 5 चे अनावरण केले, ज्याचे अनावरण बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने केले. Ioniq 5 हे Hyundai Motors चे पहिले मॉडेल आहे जे समर्पित BEV प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे.
Kia Motors
ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्या दिवशी, Kia India ने तिची सर्व इलेक्ट्रिक संकल्पना SUV Kia Concept EV9 सादर केली जी एक लांब श्रेणी आणि कूप डिझाइन केलेली SUV आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: एमजी मोटर इंडियाने लाँच केल्या सुरक्षित, शून्य उत्सर्जन असलेल्या दोन ईव्ही कार्स
BYD
चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीमने आपली नवीनतम लक्झरी इलेक्ट्रिक सेडान BYD सीलचे अनावरण केले आहे, जी कंपनी डिसेंबर २०२३ पर्यंत भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते.
Lexus India
Lexus India ने आपली नवीनतम पाचव्या-जनरेशन SUV, Lexus RS चे अनावरण केले आहे, जी कंपनी दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह लॉन्च करेल.
Atul Genentech Private Ltd
अतुल ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेडने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अतुल मोबिली आणि अतुल एनर्जी (Atul Energie या दोन इलेक्ट्रिक तीन चाकींचे अनावरण करून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली एंट्री सार्वजनिक केली आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: लक्झरी सेडान BMW i7 आणि BMW 7 सीरीज भारतात लाँच, बघताच पडाल प्रेमात; फक्त ‘एवढी’ असेल किंमत )
TORK Motors
ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्या दिवशी, टॉर्क मोटर्सने संपूर्ण इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos X (KRATOS X) चे अनावरण केले आहे, जी आकर्षक डिझाइन आणि लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक बाईक आहे.
Keeway India
Keeway India ने रेट्रो-डिझाइन केलेली क्रूझर बाईक Keeway SR250 लाँच केली आहे, जी कंपनी Benelli द्वारे विकणार आहे.
Tata Motors
टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पो २०२३ च्या पहिल्या दिवशी ऑल व्हील ड्राइव्ह इलेक्ट्रिक SUV Harrier EV लाँच केले आणि १४ वाहनांचा समावेश असलेली सर्वात सुरक्षित, स्मार्ट वाहन श्रेणी प्रदर्शित केली.