Kia India Cars: ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या सोळाव्या ऑटो एक्स्पोमध्ये, दक्षिण कोरियाची ऑटोमेकर Kia ने तिच्या नवीन EV9 संकल्पनेसह आणि नवीन KA4 MPV सह त्यांची विस्तृत वाहन श्रेणी सादर केल्या आहेत. मोबिलिटीला चालना मिळावी म्हणून कंपनीने भविष्यात २ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक संशोधन आणि विकास (R&D), पायाभूत सुविधा विकास आणि EV शी संबंधित उत्पादनासाठी वापरली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केर्न्सला किआ पोडियमवर पोलीस व्हॅन आणि रुग्णवाहिका म्हणूनही सादर करण्यात आले, जे सेगमेंटमधील पर्पज बिल्ट व्हेइकल्स (PBVs) आहेत. ब्रँडने ऑटो एक्स्पोमध्ये आपली सर्व-इलेक्ट्रिक SUV संकल्पना – Kia Concept EV9 सादर केली. दुसरीकडे, Kia KA4, एक लक्झरी RV म्हणून सादर करण्यात आली आहे, जी कंपनीने आधुनिक डिझाइन, जागतिक दर्जाची सुरक्षितता, नावीन्य आणि प्रगत ड्राइव्ह डायनॅमिक्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: पहिल्याच दिवशी Maruti पासून ते Hyundai पर्यंत ‘या’ कंपन्यांच्या गाड्यांची देशात धूम; पाहा झलक )
Kia EV9 संकल्पना
किआने सर्वप्रथम नोव्हेंबर २०२१ मध्ये लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये EV9 ही संकल्पना सादर केली होती. हे वाहन 2023 च्या पहिल्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात सादर केले जाईल. ब्रँडच्या कॅलिफोर्निया डिझाईन स्टुडिओमध्ये कारची रचना करण्यात आली आहे आणि Kia Concept EV9 इलेक्ट्रिक SUV जागतिक बाजारपेठेतही लक्ष वेधून घेत आहे. Kia च्या नवीन डिझाइन लँग्वेज ऑपोजिट्स युनायटेडवर आधारित, संकल्पना ‘बोल्ड फॉर नेचर’ पिलरने प्रभावित आहे, जी पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV संकल्पनेला ठळक आकार देण्यास मदत करते.
Kia EV9 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV मध्ये कंपनीने ७७.४ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. ३५० kW व्यतिरिक्त, कंपनी या इलेक्ट्रिक SUV सोबत नेक्स्ट जनरेशन अल्ट्रा फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील देत आहे. कंपनीचा दावा आहे की,या अल्ट्रा फास्ट चार्जरच्या मदतीने ही बॅटरी २० ते ३० मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: 6 एअरबॅग आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या Hyundai च्या ‘या’ फेसलिफ्टचे बुकिंग सुरु; किंमत… )
Kia A4
Kia KA4 कंपनीने एक उत्तम उद्देश वाहन म्हणून सादर केले आहे, ज्याला SUV डिझाइन देण्यात आले आहे. Kia KA4 ला एक प्रभावी UV स्टेन्स आणि पूर्णपणे नवीन एक्सटीरियर्स मिळतात. किआच्या कॅलिफोर्निया डिझाईन स्टुडिओने वाहनाचे आतील भाग डिझाइन केले आहे, ज्याने टेलुराइड आणि २०२१ सोरेंटो एसयूव्ही सारखी जागतिक पुरस्कार विजेती वाहने देखील तयार केली आहेत. Kia KA4 मालवाहू आणि प्रवासी जागा आणि आसन मांडणीमध्ये खरे नावीन्य दाखवते.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: दोन दिवसांत लाँच झाल्या तब्बल ८२ गाड्या; इलेक्ट्रिक वाहनांवर दिसला जास्त भर)
Kia पोलिस कार
किआने या ऑटो एक्स्पोमध्ये कॅरेन्स आधारित पोलिस कार आणि अॅम्ब्युलन्सचे व्यासपीठावर प्रदर्शन केले. यासह ब्रँडने विशिष्ट संस्थांच्या गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परपज-बिल्ट व्हेईकल किंवा PBV विभागात प्रवेश केला आहे. या पोलिस गाड्या आणि रुग्णवाहिका कंपनीच्या विद्यमान केरेन्स मॉडेलवर आधारित आहेत आणि त्यांची ओळख करून कंपनीने या विभागातही आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.