Liger X and Liger X Plus Electric Scooter unveiled at Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो मोटर शो (Auto Expo 2023) सुरु झाला आहे. तीन वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर हा ऑटो एक्स्पो मोटर शो सुरु आहे. यामध्ये अनेक नवीन कार आणि बाईक सादर केली जात आहेत. यातच आता मुंबईस्थित लीगर मोबिलिटी (Liger Mobility) ने आपली पहिली सेल्फ बैलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर प्रदर्शित केली आहे. कंपनीने २०१९ मध्ये आपली पहिली सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर उघड केली. रिपोर्ट्सनुसार, आता ही स्कूटर उत्पादनासाठी तयार आहे. ड्रायव्हिंग शिकणारे नवशिकाऊही ही ई-स्कूटर सहज चालवू शकतील. प्रवासादरम्यान ई-स्कूटर थांबल्यास किंवा वेग कमी असल्यास पडण्याची भीती राहणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Liger Mobility ची इलेक्ट्रिक स्कूटर कशी असेल खास?

कंपनीने Liger X आणि Liger X+ ला खास फीचर्स सोबत आणले आहे. Liger ने ऑटोबॅलेंसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून आपली ई-स्कूटर डिझाइन केली आहे. सेल्फ-बॅलन्सिंगबाबत कंपनीने सांगितले की, या खास वैशिष्ट्यामुळे ई-स्कूटर कमी वेगाने किंवा थांबल्यावर आपोआप संतुलन राखण्यास सक्षम असेल. साधारणपणे दुचाकीचा बॅलन्स कमी वेगापेक्षा जास्त वेगाने सहज करता येतो. पण सेल्फ-बॅलन्स फीचरने सुसज्ज असलेली ई-स्कूटर मंद गतीने किंवा थांबल्यावर संतुलित करता येते. ई-स्कूटर ड्रायव्हरला सेल्फ बॅलन्स फीचर मॅन्युअली सक्रिय करण्याचा पर्याय असेल. ड्रायव्हर त्याच्या वेगानुसार हे फीचर सेट करू शकणार आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: एका चार्जवर 631 किमी धावणाऱ्या Hyundai च्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV ची EV6 पेक्षाही किंमत कमी )

सेल्फ-बॅलन्सिंग ई-स्कूटर वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांच्या बाबतीत, दोन्ही प्रकारांमध्ये स्मार्टफोनशी कनेक्ट होण्यासाठी 4G कनेक्टिव्हिटी आणि GPS सक्षम समर्थन प्रदान केले गेले आहे. ज्याच्या मदतीने ई-स्कूटरचे लाईव्ह लोकेशन, राइड हिस्ट्री, बॅटरी पॅक एसओसी आणि टेंपरेचरची माहिती मिळेल. नवीन मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेल्या या ई-स्कूटरमध्ये अपघात, सेवा, देखभाल यासंबंधीच्या सर्व सूचनाही उपलब्ध असतील. Liger X Plus मध्ये अतिरिक्त TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. नेव्हिगेशन माहिती फोन कॉल आणि मेसेज अलर्टसह उपलब्ध राहील.

सेल्फ बॅलेन्सिंग ई-स्कूटरचा पाहा व्हिडीओ

(हे ही वाचा : अग्रलेख: सुझुकींनी सुनावले )

सेल्फ-बॅलन्सिंग ई-स्कूटर रेंज

 Liger X स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ६० किमी पर्यंत रेंज सोबत येते. याची मॅक्सिमम स्पीड ६५ किमी प्रति तास होते. यात एलसीडी डिस्प्ले, डिटॅचेबल बॅटरी सह अनेक फीचर्स दिले आहेत. Liger X+ मध्ये याची टॉप स्पीड ६५ किमी प्रति तास इतकी आहे. याची रेंज १०० किमी आहे. यात टीएफटी डिस्प्ले, ऑटो बॅलेन्स्ड रिव्हर्स मोड सह अनेक फीचर्स दिले आहेत. 

(हे ही वाचा : Auto Expo 2023: आता हातोड्याने मारूनही होणार नाही नुकसान, अशी इलेक्ट्रिक स्कूटर झाली देशात लाँच! )

सेल्फ-बॅलन्सिंग ई-स्कूटर किंमत

कंपनीचे Liger X आणि Liger X Plus प्रकार ५ रंगांमध्ये उपलब्ध असतील, त्यात ग्रे, पोलर व्हाइट, ब्लू, टायटॅनियम आणि रेड, या रंंगाचा समावेश आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग २०२३ च्या मध्यापासून सुरू होईल. माहितीनुसार, कंपनी २०२३ च्या शेवटी आपल्या ई-स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल. Liger X ची एक्स-शोरूम किंमत सुमारे १.७ लाख रुपये आणि Liger X Plus ची सुमारे १.९ लाख रुपये असेल, अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto expo 2023 liger mobility launched the worlds first electric scooters liger x and liger x plus pdb
Show comments