LML Electric Scooter: ऑटो एक्स्पो 2023 च्या दुसऱ्या दिवशी, लोहिया मशिनरी लिमिटेड (LML) ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे, जी कंपनीने भविष्यकालीन डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. आपल्या वैशिष्ट्यांमुळे आणि डिझाइनमुळे ही स्कूटर ऑटो एक्सपोमध्ये लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
LML Star Electric Scooter लॉन्चसह बुकिंग सुरु
LML इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रदर्शन करण्यासोबतच कंपनीने आपल्या बुकिंग विंडो देखील उघडल्या आहेत. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते बुक करू शकतात.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ )
LML Star Electric Scooter वैशिष्ट्ये
एलएमएल स्टार इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने सर्वात हाय-टेक फीचर्स दिले आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे ३६०-डिग्री कॅमेरा, जो स्कूटरमध्ये प्रदान केलेल्या डिस्प्लेमध्ये स्कूटरच्या मागे असलेली वाहने दर्शवतो. याशिवाय, स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिव्हर्स पार्क असिस्ट, हिल होल्ड असिस्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत. ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा मिळाल्यानंतर, हे प्रीमियम फीचर मिळवणारी LML स्टार ही सेगमेंटमधील एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे.
LML Star Electric Scooter डिझाइन
कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरला फ्युचरिस्टिक डिझाइन दिले आहे जे दिसायला खूपच आकर्षक आहे. कंपनीने ही स्कूटर पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्युअल टोनमध्ये सादर केली आहे. स्कूटरमध्ये, कंपनीने सर्व एलईडी लाइटिंगचा वापर केला आहे, ज्यामध्ये एलईडी डीआरएल देखील जोडले गेले आहेत. स्कूटरच्या पुढील भागात गोल आकाराचे हेड लाइट देण्यात आले आहे, त्यासोबत राउंड शेप एलईडी प्रोजेक्टर लाईटही लावण्यात आली आहे.
(हे ही वाचा : अग्रलेख: सुझुकींनी सुनावले)
LML Star Electric Scooter ब्रेकिंग सिस्टम
कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक बसवले आहेत ज्यात E ABS जोडले गेले आहे. यासोबतच आकर्षक डिझाईन असलेली १० इंची अलॉय व्हील्स बसवण्यात आली आहेत.
LML Star Electric Scooter ची स्पर्धा कोणासोबत होणार?
LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च झाल्यानंतर TVS iQube, Ola S1, Bajaj Chetak, Ather 450X आणि Okinawa Okhi 90 शी स्पर्धा करेल.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: मस्तच! ऑटो एक्स्पोत सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV सोबत पोलिसांसाठी ‘ही’ खास कार )
LML Star Electric Scooter ची किंमत किती?
LML ने अजून अधिकृतपणे स्टार इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, कंपनी १ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात सादर करू शकते.