MG Motors Electric Car: आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला ११ जानेवारीपासून मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली आहे. त्याच्या सोळाव्या आवृत्तीला ‘द मोटर शो’ असे नाव देण्यात आले आहे. या मोठ्या शो मध्ये देश विदेशातील मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या कारचे अनावरण केले आहे. यातच MG Motors ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये ‘MG5’ इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. ही इलेक्ट्रिक कार आधीच युरोपच्या बाजारपेठेत विकली जात आहे.
MG5 इलेक्ट्रिक कार परदेशी बाजारपेठेत यशस्वी झाल्यानंतर आता कंपनी ती कार भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची योजना आखत आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, ती चार्ज होऊन ४० मिनिटांत ४०० किमी धावू शकते. ही ही इलेक्ट्रिक कार लाँच झाल्यावर टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देईल. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक लक्झरी फीचर्स उपलब्ध आहेत.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: ऑटो एक्सपोमध्ये दिसला Kia च्या ११ सीटर MPV चा जलवा; आकर्षक लूकची चाहत्यांना भुरळ )
‘MG5’ इलेक्ट्रिक कार अशी आहे खास
MG5 इलेक्ट्रिक कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, कारला एक ठळक ब्लँक-ऑफ फ्रंट ग्रिल आणि स्वीप्ट-बॅक स्लीक हेडलॅम्प्स मिळतात. समोरच्या बंपरमध्ये चार्जिंग पोर्ट मध्यभागी आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागील भागाच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, त्यामध्ये अतिशय सुंदर दिसणारे एलईडी टेललाइट्स दिसत आहेत, जे कारच्या डिझाईनशी सुसंगत आहेत.
(हे ही वाचा : TVS Ronin की Keeway SR 250 कोणती बाईक धावणार सुसाट, पाहा फीचर, किंमत अन् इंजिनपासून सर्वकाही… )
‘MG5’ इलेक्ट्रिक पूर्णपणे दिसतेय लक्झरी कार
इलेक्ट्रिक कारच्या आतील वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह ती अतिशय सुंदर दिसते. यात ३-स्पोक स्टीयरिंग व्हील आहे, जे भविष्यवादी दिसते. कारला रोटेटिंग ड्राइव्ह मोड नॉब आणि मध्यवर्ती माउंट आयताकृती टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.