Omega Muse AC E-Rickshaw: देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्या अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. अलीकडेच, इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या ओमेगा सेकी मोबिलिटी या कंपनीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा लाँच केली आहे जी भारतातील सर्वात प्रगत तीनचाकी आहे. ‘Omega Muse’ असे या इलेक्ट्रिक रिक्षाला नाव देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘Omega Muse’ इलेक्ट्रिक रिक्षा ‘असा’ आहे खास?

ही इलेक्ट्रिक रिक्षा काही वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे जी इतर अनेक इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये आढळत नाही. कंपनीने त्यात एअर कंडिशन दिले आहे, ज्यामुळे उन्हाळ्यात केबिन थंड राहतील आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल. ही चार दरवाजे असलेली दोन आसनी ई-रिक्षा आहे. ही इलेक्ट्रिक रिक्षा पूर्णपणे पॅक आहे, त्यामुळे धूळ आणि माती तिच्या केबिनमध्ये येत नाही.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये मेड इन इंडिया ई-कचऱ्यापासून बनविलेल्या कारचा जलवा, अँबेसिडरलाही टाकेल मागे )

या रिक्षाच्या पुढील बाजूस मोठा विंडस्क्रीन लावण्यात आला असून, त्यामुळे चालकाला चांगली दृश्यमानता मिळते. यासोबतच दारावर मोठ्या खिडक्याही देण्यात आल्या आहेत. मागील प्रवाशांसाठी कारसारखे छतावर बसवलेले एसी व्हेंट देण्यात आले आहेत. ओमेगा म्युझ पूर्ण चार्ज केल्यावर १५५ किमी पर्यंतची रेंज देते.

वैशिष्ट्यांच्या बाबतीतही ही ई-रिक्षा बरीच प्रगत आहे. याच्या डॅशबोर्डमध्ये मोठा टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. याशिवाय, ते IoT तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या रिक्षात प्रवाशांना मोठा लेगरुम मिळतो. त्याचबरोबर सामान ठेवण्यासाठी त्यात २०० लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

(हे ही वाचा: नया है यह! ‘Hyundai Aura’ आता नव्या अवतारात, पाहताच क्षणी पडाल प्रेमात, पाहा किंमत अन् फीचर्स )

‘Omega Muse’ इलेक्ट्रिक रिक्षा किंमत

कंपनी लवकरच या इलेक्ट्रिक रिक्षाची विक्री सुरू करणार असून या इलेक्ट्रिक रिक्षाची किंमत ४ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.