Tata Altroz Racer Vs Hyundai i20 N-Line: टाटा मोटर्सने ऑटो एक्सपोमध्ये नुकतेच आपल्या कारचे रेसर व्हेरियंट लाँच केले आहे. स्पोर्टी लुकसोबतच फीचर्समध्ये अनेक बदलांसह सादर करण्यात आलेला स्पोर्टी हॅचबॅक ‘Altroz Racer’ लोकांना खूप आवडला आहे. लाँच करण्यासोबतच कंपनीने त्याची बुकिंगही सुरू केली आहे. Tata Altroz Racer ची आकर्षक स्पोर्टी लूक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या Hyundai i20 N Line शी टक्कर होऊल. चला तर जाणून घेऊया Tata Altroz Racer की Hyundai i20 N Line कोणती असेल तुमच्यासाठी खास.

Tata Altroz Racer मध्ये काय आहे खास?

Altroz Racer फीचर्स
टाटा अल्ट्रोझ रेसर लाल आणि काळ्या रंगाच्या ड्युअल-टोन पेंट स्कीममध्ये तयार आहे. यामध्ये अलॉय व्हीलला ग्लॉस ब्लॅक फिनिश देखील मिळते. मात्र, त्याच्या डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. Tata Altroz ​​Racer ला ड्युअल-टोन पेंट स्कीम देखील मिळते. अल्ट्रोज रेसरचा लूक आणि एक्सटीरियर स्टाइल नियमित अल्ट्रोज सारखेच आहे. मात्र, यात वॉइस असिस्टसह इलेक्ट्रिकल अ‍ॅडजस्टेबल सनरुफ सारखे नवीन फीचर्स मिळतील.

New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स

केबिनच्या आत ड्युअल-टोन पेंट स्कीम आणि नवीन आणि मोठ्या १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह एक प्रमुख अपडेट मिळते. या शक्तिशाली कारमध्ये एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील आहे, जे सध्याच्या आवृत्तीच्या अर्ध-डिजिटल युनिटची जागा घेते. Altroz ​​Racer मध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, व्हॉईस-अ‍ॅक्टिव्हेटेड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि एअर प्युरिफायर आहे.

कारच्या फ्रंट लूकबद्दल सांगायचे तर, यात रुंद क्रोम बार देण्यात आला आहे. तसेच, शानदार हेडलाइट्स, ब्लॅक्ड-आउट रुफ आणि ट्विन व्हाइट रेसिंग स्ट्राइप्ससह बोनट मिळेल. मागील बाजूला शार्क फिन अँटिना दिला आहे. तर एलॉय व्हील्स आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे.

(हे ही वाचा: Mahindra Thar Vs Maruti Jimny: मारुती जिमनी की महिंद्रा थार? कोणती कार सर्वात भारी? येथे वाचा संपूर्ण माहिती )

Tata Altroz Racer इंजिन आणि पॉवर
Tata Altroz Racer मध्ये १.२ -लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. त्याची मोटर १२० एचपी आणि १७० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. जे ६-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येते. Tata Altroz Racer ची विक्री कधी सुरू होणार याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

Hyundai i20 N Line मध्ये काय आहे खास?

Hyundai i20 N Line फीचर्स

Hyundai i20 N Line कारच्या फीचर्समध्ये अपडेटेड ब्लू लिंक अ‍ॅप आणि नवीन व्हाइस फंक्शन्स दिले आहे. Hyundai i20 N Line चे इंजिन आणि पॉवर मध्ये रेग्युलर मॉडल प्रमाणे १.० लीटरचे ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. जे १२०bhp पर्यंत पॉवर आणि १७२Nm टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. ह्युंदाई आय २० एन लाइन N8 व्हेरियंट मध्ये पॅडल शिफ्टर्स सोबत ७ स्पीड DCT ऑटोमॅटिक गियरबॉक्स मिळतात. iMT ट्रांसमिशन ऑप्शन मध्ये 6 स्पीड गियरबॉक्स मिळतात.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: ऑटो एक्सपोमध्ये दिसला Kia च्या ११ सीटर MPV चा जलवा; आकर्षक लूकची चाहत्यांना भुरळ )

Hyundai i20 N Line लूक आणि डिझाइन

Hyundai i20 N Line च्या लूक आणि फीचर्स मध्ये न्यू थंडर ब्लू, पोलर व्हाइट, फियरी रेड आणि टायटन ग्रे मध्ये उपलब्ध या स्पोर्टी हॅचबॅक मध्ये चेकर्ड प्लॅगने इंस्पायर्ड फ्रंट ग्रिल, एन लाइन लोगो, स्पोर्टी रेड अ‍ॅक्सेंट आणि ड्युअल टोन बंपर मध्ये इंटिग्रेटेड फॉग लॅम्प्स सोबत फ्रंट स्पिलटर ही दिले आहेत. यात १६ इंचाचा अलॉय व्हील्ज सोबत रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर्स दिले आहेत. साइडने पाहिल्यास ही कार रेड इन्सर्ट मुळे खूप जबरदस्त वाटते. यात ट्विट एक्जॉस्ट पाइप, टेललॅम्प क्लस्टर, जास्त स्पोर्टी बंपर आणि साइड विंग्स सोबत टेलगेट स्पॉइलर दिले आहे.

Hyundai i20 N Line कारची किंमत

भारतात Hyundai i20 N Line च्या N6 iMT व्हेरियंटला ९.८४ लाख रुपये (एक्स शोरूम) मध्ये लाँच करण्यात आले आहे. तर Hyundai i20 N Line च्या N8 iMT व्हेरियंटची किंमत १०.८७ लाख रुपये आहे. याच्या टॉप अँड व्हेरियंट Hyundai i20 N Line N8 DCT ची किंमत ११.७५ लाख रुपये आहे. १५ हजार रुपये एक्स्ट्रा देऊन या कारला ड्युअल टोन ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.

Story img Loader