Tata Motors Auto Expo 2023: जगातील सर्वात मोठा ऑटो एक्सपो 2023 शो भारतात सुरु आहे. यात अनेक कंपन्यांनी आपल्या नवीन कारचे मॉडेल सादर केले आहे. देशातील आघाडीची ऑटो कंपनी टाटा मोटर्सने देखील अनेक आलिशान वाहने सादर केली आहेत. Tata Motors ने Tata Sierra EV आणि Harrier EV सारख्या कारसह एकूण ११ कारचे अनावरण केले आहे. याशिवाय अनेक व्यावसायिक वाहनेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. कंपनीने भारतातील सर्वात मोठ्या ऑटो शोमध्ये एकूण ५ इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत.

टाटा मोटर्सने सादर केली ११ वाहने

टाटा मोटर्सने ऑटो एक्सपोमध्ये ११ वाहने सादर केली आहेत, ज्यात ५ इलेक्ट्रिक, २ सीएनजी आणि २ कॉन्सेप्ट कार आहेत. त्याच वेळी, कंपनीने व्यावसायिक विभागात हायड्रोजन इंधन सेल मॉडेलसह एकूण १४ ट्रक सादर केले आहेत. टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. ऑटो एक्स्पोमध्येही कंपनीने ग्राहकांची निराशा केलेली नाही. ऑटो इव्हेंटमध्ये, कंपनीने Sierra EV आणि Harrier EV सारख्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत ज्यात Avinya Concept EV समाविष्ट आहे.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

(हे ही वाचा : Auto Expo 2023: 300 किमी रेंज असलेली जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक सादर; पाहा भन्नाट फीचर्स आणि किंमत…)

Tata Harrier EV पाहा कशी दिसते

(हे ही वाचा : Auto Expo 2023: टोयोटाने सादर केली हायड्रोजन कार; धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या कारमध्ये ‘हे’ आहे खास )

१.टाटा अविन्या ईवी कॉन्सैप्ट (Tata Avinya EV Concept)
२. टाटा सिएरा ईवी (Tata Sierra EV)
३. टाटा टियागो ईवी ब्लिट्ज(Tata Tiago EV Blitz)
४. टाटा टियागो ईवी (Tata Tiago EV)
५. टाटा हैरियर ईवी (Tata Harrier EV)
६. टाटा कर्व कॉन्सैप्ट (Tata Curvv Concept)
७. टाटा सफारी डार्क (Tata Safari Dark)
८. टाटा हैरियर डार्क (Tata Harrier Dark)
९. टाटा अल्ट्रोज रेसर (Tata Altroz Racer)
१०. टाटा पंच आईसीएनजी (Tata Punch iCNG)
११. टाटा अल्ट्रोज आईसीएनजी (Tata Altroz iCNG)

Story img Loader