Tata Motors Altroz Racer: टाटा मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. चार इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन तसेच हॅचबॅक अल्ट्रासचे सीएनजी प्रकार सादर केल्यानंतर, टाटा मोटर्सने आता आपल्या कारचे रेसर व्हेरियंट लॉन्च केले आहे. स्पोर्टी लुकसोबतच फीचर्समध्ये अनेक बदलांसह सादर करण्यात आलेला स्पोर्टी हॅचबॅक Altroz Racer लोकांना खूप आवडला आहे. लॉन्च करण्यासोबतच कंपनीने त्याची बुकिंगही सुरू केली आहे.
Altroz Racer फीचर्स
टाटा अल्ट्रोझ रेसर लाल आणि काळ्या रंगाच्या ड्युअल-टोन पेंट स्कीममध्ये तयार आहे. यामध्ये अलॉय व्हीलला ग्लॉस ब्लॅक फिनिश देखील मिळते. मात्र, त्याच्या डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. Tata Altroz Racer ला ड्युअल-टोन पेंट स्कीम देखील मिळते. अल्ट्रोज रेसरचा लूक आणि एक्सटीरियर स्टाइल नियमित अल्ट्रोज सारखेच आहे. मात्र, यात वॉइस असिस्टसह इलेक्ट्रिकल अॅडजस्टेबल सनरुफ सारखे नवीन फीचर्स मिळतील.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: टोयोटाने सादर केली हायड्रोजन कार; धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या कारमध्ये ‘हे’ आहे खास )
केबिनच्या आत ड्युअल-टोन पेंट स्कीम आणि नवीन आणि मोठ्या १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह एक प्रमुख अपडेट मिळते. या शक्तिशाली कारमध्ये एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील आहे, जे सध्याच्या आवृत्तीच्या अर्ध-डिजिटल युनिटची जागा घेते. Altroz Racer मध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, व्हॉईस-अॅक्टिव्हेटेड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि एअर प्युरिफायर आहे.
कारच्या फ्रंट लूकबद्दल सांगायचे तर यात रुंद क्रोम बार देण्यात आला आहे. तसेच, शानदार हेडलाइट्स, ब्लॅक्ड-आउट रुफ आणि ट्विन व्हाइट रेसिंग स्ट्राइप्ससह बोनट मिळेल. मागील बाजूला शार्क फिन अँटिना दिला आहे. तर एलॉय व्हील्स आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ )
(हे ही वाचा : Auto Expo 2023: 300 किमी रेंज असलेली जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक सादर; पाहा भन्नाट फीचर्स आणि किंमत…)
Tata Altroz Racer इंजिन आणि पॉवर
Tata Altroz Racer मध्ये १.२ -लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. त्याची मोटर १२० एचपी आणि १७० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. जे ६-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येते.
Tata Altroz Racer ची विक्री कधी सुरू होणार याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, विक्री सुरू झाल्यावर ही हॅचबॅक मारुती सुझुकी बलेनो, टोयोटा ग्लान्झा Hyundai i20 N Line ला टक्कर देईल.