Best Cars Auto Expo 2023: सलग दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देशात सर्वात मोठा ऑटो शो ‘ऑटो एक्स्पो’ (Auto expo 2023) सुरु झाला आहे. हा शो ११ जानेवारीपासून सुरु झाला असून तो १८ जानेवारीपर्य़ंत चालणार आहे. ऑटो एक्स्पो शो ग्रेटर नोएडा येथे सुरु असून यात देश विदेशातील बड्या वाहन कंपन्या सहभागी होत आहेत. देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीपासून ते ह्युंदाई, टोयोटा लेक्सस आणि बीवायडी सारख्या वाहन उद्योगातील मोठ्या कंपन्यांनी आपली जबरदस्त वाहने अनवील केले आहेत. चला तर पाहूया ऑटो एक्स्पोमध्ये कोणत्या वाहनांनी वाहनप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑटो एक्स्पो शो मध्ये ‘या’ वाहनांनी सोडली छाप

Maruti Suzuki

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki चा या कार्यक्रमात सर्वात मोठा स्टॉल आहे. मारुतीने कारच्या उपलब्ध रेंजला नवीन अंदाजात आणले आहे. यात नवीन रंगासोबत अनवील केले आहे. यात दोन ब्रेझा आणि ग्रँड विटारा आहेत. ब्रेझाला एका वेगळ्या रंगामध्ये आणले आहे. या ठिकाणी ब्लॅक शेडमध्ये नवीन 2023 Maruti Brezza दिसली आहे. Brezza शिवाय, Marutiने Grand Vitara ला सुद्धा हीच ट्रिटमेंट दिली आहे. यात ६ एअरबॅगचा समावेश असून एक फ्रंट मध्ये, एक साइड आणि कर्टन उपलब्ध आहे.

(हे ही वाचा: Mahindra Thar Vs Maruti Jimny: मारुती जिमनी की महिंद्रा थार? कोणती कार सर्वात भारी? येथे वाचा संपूर्ण माहिती)

Hyundai

दक्षिण कोरियाची कार कंपनी भारतात आपली कार लाइनअप मजबूत करत आहे. कंपनी Hyundaiने ऑटो एक्सपो २०२३ मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक ‘IONIQ6 SUV’ लाँच केली आहे. Ioniq 6 ही कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. तर, Kona EV आणि Ioniq 5 या कंपनीच्या सुरुवातीच्याच कार आहेत. Hyundai Ioniq 6 इलेक्ट्रिक सेडानला पारंपारिक ORVM च्या जागी फ्लश डोअर हँडल आणि कॅमेरे मिळतात. नवीन Hyundai Ioniq 6 मध्ये ५३ kWh आणि ७७ kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळते हे कार ६१४ किमीची रेंज देऊ शकते. त्याची AWD व्हर्जन ५८३ किमीची WLTP प्रमाणित रेंज ऑफर करण्यास सक्षम आहे.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: लष्करासाठी येतेय मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक SUV; एका चार्जमध्ये मिळेल 500 किमी पेक्षा जास्त रेंज)

Lexus LF 30 Concept

टोयोटाच्या लक्झरी ब्रँड लेक्ससने आपली संकल्पना LF 30 कार येथे प्रदर्शित केली. लेक्सस LF 30 ही संकल्पना ऑटो एक्सपो २०२३ मधील सर्वात अनोखी कार आहे. त्याची रचना पूर्णपणे वेगळी होती. मात्र, ही एक कॉन्सेप्ट कार असून ती कधी लॉन्च केली जाईल किंवा लॉन्च केली जाईल की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. Lexus LF 30 संकल्पना ही ४ सीटर कार आहे. येथे प्रदर्शित केलेल्या मॉडेलचे स्टीयरिंग डाव्या हाताला आहे. या गाडीची ५०९० मिमी, रुंदी १९५५ मिमी, उंची १६०० मिमी, व्हीलबेस ३२०० मिमी आणि वजन २४०० किलो असेल. कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्याची रेंज ५०० किमी असेल आणि ती ११० kW/h बॅटरी पॅकद्वारे समर्थित असेल.

(हे ही वाचा: Nissanची दमदार SUV लवकरच होणार लाँच; फीचर आणि लूक एकदम जबरदस्त, फॉर्च्युनरला देणार टक्कर )

Pravaig Electric SUV

बेंगळुरू येथील स्टार्टअप Pravaig Dynamics ने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये Pravaig Defy Electric SUV तसेच देशातील जवानांसाठी खास ‘प्रवेग वीर’ अनवील केली आहे. वीर ईव्हीला १० लाख किलोमीटर पर्यंत चालवता येवू शकते. यात ड्युअल इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. जी ४०८hp पॉवर आणि ६२० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. प्रवेग वीर ईवी मध्ये ९०.९kWh ची लिथियन आयन बॅटरी दिली आहे. यावरून कंपनीचा दावा आहे की, प्रावेग वीरला एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किमी पर्यंतची रेंज मिळते. या गाडीला अर्ध्या तासात शून्य ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येवू शकते.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: प्रति किमी खर्च फक्त ८० पैसे, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार)

BYD Electric Car Unveil

चायनीज कंपनी बीवायडी ने यावर्षीच्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये आपली इलेक्ट्रिक सेडान बीवायडी सील अनवील केली आहे. आगामी काळात याला इंडियन मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या कारची किंमत यावर्षी फेस्टिव्हल सीजनमध्ये उघड केली जाईल. बीवायडीची अपकमिंग इलेक्ट्रिक कार याची लांबी ४.८ मीटर, रुंदी १.८७५ मीटर आणि उंची १.४६ मीटर आहे. तर पॉवरट्रेनमध्ये बीवायईडी सीलला ६१.४kWh आणि ८२.५kWh सारख्या दोन बॅटरी पॅक ऑप्शन मध्ये आणले जावू शकते. याची बॅटरी रेंज ५५० किमी ते ७० किमी पर्यंत असू शकते. याची इलेक्ट्रिक मोटर 204 bhp चे पॉवर जनरेट करू शकते. तर ही इलेक्ट्रिक सेडान केवळ ३.९ सेकंदात शून्य ते १०० kmph ची स्पीड पकडू शकते.