300KM range Electric Bike: ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहने पाहायला मिळत आहेत. यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात इंडिया मेड सुपर बाईक अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या दोन मोटारसायकल F77 ओरिजिनल आणि द रीकॉन सादर केल्या आहेत. या दोन्ही बाईकचे फीचर्स खूप खास आहेत आणि त्यांची रचना देखील खूप लोकांना आकर्षित करू शकते. चला तर जाणून घेऊया या मोटारसायकलींमध्ये काय आहे खास.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटारसायकलींची वैशिष्ट्ये

अल्ट्राव्हायलेट ही बंगळुरूची कंपनी आहे. त्यांनी बनवलेल्या बाइक्स तरुणाईला खूप आवडतात. यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही F77 ओरिजिनल सिंगल चार्जमध्ये सुमारे २०६ किमी आणि रीकॉन ३०७ किमीची रेंज देते. मोटरसायकलचा लूक खूपच शानदार आहे. मॉडेलचा टॉप स्पीड १४० kmph आहे आणि Recon मॉडेलचा टॉप स्पीड सुमारे १४७ kmph आहे. या बाइक्समध्ये ७.१ आणि १०.३ kWh क्षमतेच्या बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. या बाइक्सना सामान्य चार्जरने चार्ज करण्यासाठी ९ तास आणि फास्ट चार्जरने ३.५ तास लागतात.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: LML ची धमाकेदार एंट्री, सादर केला देशातील पहिला 360 डिग्री व्यू कॅमेरावाला Star Electric Scooter)

डिझाइन कसे आहे?

त्याची रचना अतिशय उत्तम आणि आकर्षक आहे. हे स्पोर्ट्स बाइकचा लूक देते. यात सुपरसोनिक सिल्व्हर, स्टेल्थ ग्रे आणि प्लाझ्मा रेड असे तीन रंग पर्याय आहेत.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ)

किंमत किती?

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, F77 Original ची सुरुवातीची किंमत ३.८० लाख रुपये आहे आणि F77 Recon ची सुरुवातीची किंमत ४.५५ लाख रुपये आहे, ही एक्स-शोरूम किंमत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto expo 2023 ultraviolette f77 launches two electric bikes f77 original and f77 recon pdb
Show comments