WardWizard Innovations & Mobility Electric scooter: आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरची ‘Joy e-Bikes’ या ब्रँड नावाने बाजारात विक्री करणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक WardWizard Innovations & Mobility ने ऑटो एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी आपली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘MIHOS’ लाँच केली आहे. ही स्कूटर बनवण्यासाठी कंपनीने पॉली मटेरियल वापरले आहे. या मटेरियलच्या वापरामुळे स्कूटरला हातोड्याने जरी मार लागला तरी तिच्या बाॅडीला इजा होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MIHOS इलेक्ट्रिक स्कूटर प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज

कंपनीच्या मते, याचा व्हीलबेस १३६०mm आहे. यामध्ये सर्व LED लाइटिंग सेटअप देण्यात आले आहेत. कंपनीने ही स्कूटर मेटॅलिक ब्लू, सॉलिड ब्लॅक ग्लॉसी, सॉलिड यलो ग्लॉसी आणि पर्ल व्हाईट या चार खास रंगांच्या निवडीमध्ये लाँच केली आहे. याशिवाय ड्रायव्हरच्या सुरक्षेचा विचार करून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल वैशिष्ट्यांसह साउंड सिम्युलेटरही देण्यात आला आहे.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग )

MIHOS इलेक्ट्रिक स्कूटर वैशिष्ट्ये

या स्कूटरला रेट्रो स्टाइलिंग देण्यात आली आहे. तसेच यामध्ये रुंद आणि लांब आसनांचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हरच्या सोयी लक्षात घेऊन, मागे मोनो रिव्हर्सिबल स्प्रिंग सस्पेंशनसह टेलिस्कोपिक सस्पेन्शन सेटअप देण्यात आला आहे. MIHOS ची रचना भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार आणि १७५ मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह केली गेली आहे. या स्कूटरमध्ये साइड स्टँड सेन्सर आणि हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) देखील आहेत. यासोबतच रिव्हर्स मोड, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, अँटी थेफ्ट अलार्म सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ )

एका चार्जमध्ये १०० किलोमीटरपर्यंतची रेंज

MIHOS स्कूटर एका चार्जवर १०० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे. तसेच, ही स्कूटर ७ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ०-४० किमी प्रतितास वेग मिळवू शकते. MIHOS मध्ये 74V40Ah Li-ion आधारित बॅटरी देण्यात आली आहे. पहिल्या पाचशे खरेदीदारांसाठी या स्कूटरची किंमत १.४९ लाख रुपये असेल.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: 300 किमी रेंज असलेली जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक सादर; पाहा भन्नाट फीचर्स आणि किंमत… )

कंपनीने सिटी इलेक्ट्रिक मोटरसायकल ‘रॉकफेलर’ ची दाखवली झलक

कंपनीने इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेटमध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी सिटी इलेक्ट्रिक मोटरसायकल ‘रॉकफेलर’ देखील सादर केली आहे. दैनंदिन वापराचा विचार करून ही मोटारसायकल तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या मते, ही मोटरसायकल २०२४ च्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto expo 2023 wardwizard innovations and mobility electric scooter has launched the mihos electric scooter pdb