New Suzuki Access 125 : 125 cc स्कूटर सेग्मेंटमध्ये सुझुकी अॅक्सेस 125 सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. बऱ्याच दिवसांपासून या स्कूटरचे कोणतेही अपडेटेड मॉडेल लाँच झाले नव्हते. परंतु, अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये Access 125 ची 2025 नवीन व्हर्जन लाँच केली आहे. पण आता त्याच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ही स्कूटर तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. Access 125 ची किंमत ८१,७०० ते ९३,३०० रुपयांच्या दरम्यान आहे. याच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये काहीतरी खास आणि नवीन पाहायला मिळेल का ते जाणून घेऊ.

सुझुकी अॅक्सेस 125 स्टॅण्डर्ड एडिशन

नवीन Access Standard Edition ची किंमत ८१,७०० रुपयांपासून सुरू होते. फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, त्यात एलसीडी इन्स्ट्रुमेंट स्क्रीन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, हॅजार्ड लाइट आणि पुढील बाजूस ड्युअल युटिलिटी पॉकेट्स आहेत.

New BMW iX1 LWB Launched EV car
New BMW iX1 LWB : बीएमडब्ल्यूने लाँच केली EV कार! एकदा चार्ज केल्यानंतर धावणार ५३१ किमी; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
World Economic Forum Davos Investment for Maharashtra
Davos Investment : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींचे करार; महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार मोठा बूस्ट
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
First Miss World Kiki Hakansson Death
First Miss World : जगातली पहिली ‘विश्वसुंदरी’ काळाच्या पडद्याआड! किकी हॅकन्सन यांचं ९५ व्या वर्षी निधन

सेफ्टीसाठी स्कूटरमध्ये CBS सिस्टीम, पार्किंग ब्रेक आणि साइड स्टॅण्ड इंटरलॉक देण्यात आले आहे. ही स्कूटरमध्ये पर्ल ग्रेस व्हाइट, मेटॅलिक मॅट ब्लॅक व मेटॅलिक मॅट स्टेलर ब्ल्यू हे कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

सुझुकी अॅक्सेस 125 स्पेशल एडिशन

नवीन अॅक्सेस स्पेशल एडिशनची किंमत ८८,२०० रुपये आहे. या स्कूटरमध्ये सॉलिड आइस ग्रीन कलरव्यतिरिक्त तुम्हाला आणखी तीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. उत्तम ब्रेकिंगसाठी यात समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेकची सुविधा आहे. हे बेस मॉडेलपेक्षा थोडे अपडेटेट मॉडेल आहे.

सुझुकी अॅक्सेस 125 ची राइड कनेक्ट एडिशन

राइड कनेक्ट एडिशन हा नवीन अॅक्सेस स्कूटरचा टॉप व्हेरिएंट आहे. त्याची किंमत ९३,००० रुपये आहे. त्यामध्ये तुम्हाला अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळणार आहेत. या स्कूटरमध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. त्यासह युजर्सना कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप अलर्ट, ओव्हर स्पीडिंग अलर्ट, वेदर अपडेट्स व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स मिळतात. या स्कूटरमध्ये एक डिजिटल वॉलेटदेखील आहे; ज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणीच्या सॉफ्ट कॉपी ठेवल्या जाऊ शकतात.

डिझाइन आणि इंजिन

नवीन Suzuki Access 125 ची डिझाइन आता खूपच चांगली दिसते आहे. त्यामुळे ही स्कूटर खूप स्मार्ट आणि स्लिम दिसतेय. आता ही स्कूटर तरुणाईबरोबरच कुटुंबीयांनाही आवडीची झाली आहे. या स्कूटरमध्ये 124cc, सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 8.4bhp पॉवर आणि 10.2Nm टॉर्क जनरेट करते. त्यात CVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. आरामदायी राईडसाठी, स्कूटरमध्ये समोर टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस स्विंग आर्म सस्पेन्शन आहे.

Story img Loader