Nimbus One Electric Vehicle: शहरांमध्ये ई-स्कूटर कंपन्यांच्या प्रवेशामुळे ई-बाईकच्या विक्रीत वाढ झाली आहे. वाहतूक कोंडीचे रस्ते टाळण्यासाठी ई-बाईकचा वापर मायक्रोमोबिलिटी म्हणून केला जात आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात दुचाकीवरून चालणेही अवघड होऊन बसते. अशा स्थितीत या समस्येवर तोडगा काढताना निंबस कंपनीने दुचाकीला छत टाकले आहे.

Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to Maharashtra
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
north koreal ballistic missile test
हुकूमशाह किम जोंग उनने केली जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्राची चाचणी? काय आहे उत्तर कोरियाकडील आयसीबीएम?

निंबस वन ही तीन चाकी गाडी आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिशिगन-आधारित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप निंबसने नुकतेच एक प्रोटोटाइप वाहन ‘निंबस वन’ लॉन्च केले आहे. दिसायला लहान असलेले हे तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन (EV) आहे जे कारची सुरक्षितता आणि बाईकची सोय आणि आनंद दोन्ही गोष्टी देते.

रहदारीच्या रस्त्यांसाठी योग्य
हे वाहन २.७५ फूट रुंद आणि ७.५ फूट लांब आहे. निंबस म्हणतात की, ती कॉम्पॅक्ट कारपेक्षा तीन ते पाच पट लहान आहे. शहरातील वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यावर ही गाडी चालवणे सोपे आहे. यामध्ये मागच्या बाजूला दुसऱ्या प्रवाशाला बसण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच सामान ठेवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

आणखी वाचा : ४ लाखांचे बजेट नसेल तर काळजी करू नका, केवळ ८० हजार ते १ लाखात मिळेल Maruti Alto, जाणून घ्या ऑफर

अमेरिकेत ऑटो-सायकल मानली जाते
निंबस वनला यूएसमध्ये ऑटो-सायकल म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे, याचा अर्थ बाइक आणि कार या दोन्ही जगात ती सर्वोत्तम आहे. यासाठी स्वतंत्र मोटारसायकल परवाना आवश्यक नाही. कारचा परवाना असलेला कोणीही ही गाडी चालवू शकतो आणि त्यांना हेल्मेट घालण्याचीही गरज नाही.

एका चार्जवर ९३ मैल इतका प्रवास
निंबस वन सिटी ड्रायव्हिंगसाठी बनवले आहे. त्याचा टॉप स्पीड ५० mph आहे. कंपनीच्या मते त्याच्या ९ kWh बॅटरीची रेंज ९३ मैलांचे अंतर सहज पार करू शकते. त्याची बॅटरी लेव्हल २ चार्जरवर १.२ तासांमध्ये आणि होम पॉवरवर ५.४ तासांमध्ये चार्ज होते. त्याची बॅटरी गाडीतून काढता येऊ शकते, याचा फायदा म्हणजे बॅटरी घरी नेऊनही चार्ज करता येते.

आणखी वाचा : केवळ १४ ते १८ हजारात मिळतेय Bajaj Platina, शोरूममधून खरेदी केल्यास ६० हजार मोजावे लागतील, जाणून घ्या ऑफर

उत्तम फीचर्स
निंबस वनच्या मिनिमलिस्ट इंटीरियरमध्ये डिस्प्ले स्क्रीन, ब्लूटूथ-कनेक्टेड स्पीकर, पॉवर विंडो, एक वेगवान फोन चार्जर, हीटिंग आणि पर्यायी एअर कंडीशनिंग समाविष्ट आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आगामी स्पर्धेची चेतावनी देण्यासाठी गाडीमध्ये सेन्सर देण्यात आला आहे.

पुढील वर्षापासून डिलिव्हरी
निंबस वनच्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. महिन्याभरात ग्राहकांना टेस्ट ड्राइव्ह देण्यात येईल. कंपनी प्रति ऑर्डर $100 (सुमारे ७,७६९ रुपये) डाउन पेमेंट घेत आहे. संपूर्णपणे खरेदी करण्यासाठी वाहनांची किंमत सुमारे $9,980 (रु. ७,७५,४४१) असेल. निंबसला २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत पहिली डिलिव्हरी होण्याची अपेक्षा आहे, परंतु कंपनीने अद्याप त्याचे लॉन्च करण्याचे शहर निवडलेले नाही.