जुलै २०२३ हा महिना भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी व्यस्त ठरणार आहे. जुलै महिन्यामध्ये अनेक कंपन्या आपल्या नवीन कार्स लॅान्च करणार आहेत. जुलै महिन्यात पॅसेंजर व्हेइकल (PV) सेगमेंटचा विचार करता अनेक कंपन्या आपली नवीन मॉडेल्स सादर करणार आहे. काही मॉडेल्सचे बुकिंग आतापासून सुरू झाले आहे. त्यामध्ये काही हॅचबॅक आणि एसयूव्ही कार्सचा समावेश आहे. यामध्ये मारुती सुझुकी,ह्युंदाई, किया आणि होंडा कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. जुलैमध्ये कोणकोणत्या कार्स लॉन्च होणार आहेत. त्याबद्दलची माहिती पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारूती सुझुकी इंडिया ५ जुलै रोजी आपली टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित Invicto लॉन्च करणार आहे. तर ह्युंदाई मोटर इंडिया १० जुलै रोजी Exter एसयूव्ही लॉन्च करणार आहे. मात्र याआधी किया इंडिया आपली किया सेलटॉस २०२३ ही कार ४ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. तसेच होंडा कार्स इंडिया पुढील महिन्यात आपल्या Honda Elevate साठी देखील बुकिंग सुरू करेल. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

हेही वाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा, आता प्रत्येक ट्रकमध्ये AC बसवणं बंधनकारक, कारण…

मारूती सुझुकी Invicto

मारूती सुझुकी Invicto साठी १९ जूनपासून बुकिंग सुरू झाले आहे. २५ हजार रुपयांमध्ये याचे बुकिंग करता येणार आहे. याची विक्री मारूतीच्या Nexa या आउटलेटवरून केली जाणार आहे. ज्यामध्ये इग्निस, बलेनो, सियाझ, XL6, फ्रॉन्क्स आणि जिमनी यांचा समावेश आहे. Invicto ची किंमत १८ ते ३० लाख (एक्स-शोरूम) रूपये असण्याची शक्यता आहे. इन्व्हिक्टोचे फीचर्स इनोव्हा हायक्रॉस सारखेच असले तरी बाहेरील बॉडीमध्ये काही बदल केले जाऊ शकतात.

Invicto ही नवीन कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV आधारित असणार आहे. मारूती सुझुकीने या महिन्यात अधिकृतपणे कारच्या लॉन्चिंगबद्दल पुष्टी केली आहे. यामध्ये डिझाईनमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात. ज्यामध्ये सुझुकीच्या लोगोसह एक नवीन ग्रील आणि पुन्हा नव्याने डिझाईन केलेले अलॉय व्हील्सचा समावेश आहे. फीचर्सच्या बाबतीत या प्रीमियम MPV कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह १०. १ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ मिळणार आहे. तसेच Advance असिस्टन्स सिस्टीम (ADAS ) चा सपोर्ट मिळणार आहे.

ह्युंदाई Exter

ह्युंदाई Exter च्या किंमतीशिवाय बाकीचे डिटेल्स आधीच उघड झाले आहेत. ही मायक्रो एसयूव्ही टाटा पंचला टक्कर देईल. एक्सटरची किंमत ६ लाख ते ९.५० लाख (एक्स-शोरूम) रुपये असण्याची शक्यता आहे. नवीन ह्युंदाई exter चा डॅशबोर्ड ग्रँड i10 Nios आणि Aura च्या डॅशबोर्ड सारखे आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple कार प्ले आणि ह्युंदाईच्या BlueLink कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह यामध्ये ८.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच या एसयूव्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ग्राहकांना मिळणार आहे.

ह्युंदाई कंपनी आपलू मायक्रो एसयूव्ही १० जुलै रोजी भारतामध्ये लॉन्च करणार आहे. ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा Hyundai डीलरशिपवरून बुक केले जाऊ शकते.

हेही वाचा : भारतात लवकरच लॉन्च होणार ह्युंदाईची Exter मायक्रो एसयूव्ही ; जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Kia Seltos 2023

Kia India ही देशातील एक वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. २०१९ मध्ये किया इंडियाने आपली मध्यम आकाराची SUV Kia Seltos केली होती जी पूर्णपणे मेड इन इंडिया कार होती. किया सेलटॉस लॉन्च झाल्यानंतर त्याच्या सेगमेंटमध्ये कंपनीला मोठे यश मिळाले आहे. २०१९ मध्ये लॉन्च झालेल्या एसयूव्हीला काही अपडेट देण्यात आले होते. आता लवकरच या एसयूव्हीचे फेसलिफ्टऐड व्हेरिएंट लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

किया इंडिया सेलटॉसला अधिक प्रीमियम करण्याच्या विचारात आहे. एसयूव्हीमध्ये १०.२५ इंचाचे दोन डिजिटल डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि ड्रायव्हरचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे फीचर्स असण्याची शक्यता आहे. सेफ्टीच्या दृष्टीने सेलटॉस ADAS या सिस्टीमने सुसज्ज असणार आहे. यामध्ये ब्लाइंड स्पॉट कोलिशन वॉर्निंग, 360-डिग्री कॅमेरा, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, हाय बीम असिस्ट, लेन फॉलोइंग असिस्ट आणि रीअर व्ह्यू मॉनिटर यांसारखी फीचर्स मिळू शकतात.

Honda Elevate

होंडा Elevate ने या महिन्याच्या सुरूवातीला जागतिक स्तरावर पदार्पण केले आहे. ज्याचे बुकिंग जुलैमध्ये सुरू होणार आहे. ही कार सणासुदीच्या काळामध्ये लॉन्च होऊ शकते. Elevate क्रेटा, सेलटॉस आणि ग्रँड विटारा यासह अन्य सेगमेंटमध्ये प्रवेश करेल. Elevate ची किंमत १०.५० लाख ते १८ (एक्स-शोरूम) रुपयांच्या मध्ये असण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत होंडा भारतात पाच एसयूव्ही लॉन्च करणार आहे. Elevate ही त्यातील पहिली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autombile industry busy july 2023 exter invicto elevate and seltos 2023 launch in india tmb 01
Show comments