मुंबईत असलेल्या ऑटोमोबाइल-ए-ए-सर्विस कंपनी Autonomous Intelligence Motors Private Limited (AIMPL) या कंपनीने बुधवारी एक घोषणा केली आहे. ही कंपनी पुढील वर्षी देशात आर्टिफिशियल इंटेलिजेंस-ऑफ-थिंग्स (AIoT) तंत्र प्रणालीतून लेस ऑटोनॉमस कार लॉंच करणार आहे. विना ड्रायव्हरची असलेली ही पेट्रोल आणि डिझेल हॅचबॅक व्हेरिएंट कार भारतात मार्च २०२२ मध्ये लॉंच केली जाणार आहे.
अशा प्रकारची ही पहिली आणि एआय-पॉवर्ड ड्रायव्हरलेस कार इलेक्ट्रिक व्हेरिएंट व्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांसाठी BS-8 इंधन उत्सर्जन अनुरूप इंजिनसह सुसज्ज कार असणार आहे.
फुल ऑटोनॉमस कारमध्ये इंटीग्रेटेड कस्टम सेंसर, कॅमरे आणि रडार असणार आहेत. या कारमध्ये स्थापित करण्यात आलेले अनेक सेन्सर्स आणि अल्गोरिदममधून मिळालेला डेटा कारमधील परसेप्शन सिस्टीम वापरेल. ही यंत्रणा रस्त्याच्या वळणावर, खड्डे, रस्ते, गल्ली बोळ्यांवर लक्ष ठेवणार आहे.
सेन्सरद्वारे होणार ओळख
या कारमधील सेन्सरमध्ये आपत्कालीन वळण, रस्त्यांमधील अडथळे, वाहतूक कोंडी, धुकेयुक्त हवामान, मुसळधार पाऊस यासारखे असंख्य अडथळे शोधण्याची क्षमता आहे. जे लेनमधून बाहेर पडत किंवा रस्त्याच्या मध्यभागी अचानक थांबलेल्या ऑटोरिक्षा, स्कूटर किंवा टॅक्सींची गर्दी देखील या कारमधील यंत्रणा शोधू शकते. तसंच रस्त्याच्या मधोमध चालत असलेल्या हातगाड्यांची देखील ओळख करू शकते.
सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हलेस कार कोणत्याही ठिकाणी सामान्य परिस्थितीची त्वरीत ओळखू करू शकते आणि सुमारे ५०० मीटरचे अंतर देखील पार करू शकते. ही कार ५० टक्के गुगल मॅपवर आणि उर्वरित कंपनीच्या सेन्सर्सवर अवलंबून असेल.
२०१४ मध्ये प्रथमच सादर केली कार
AIMPL च्या ड्रायव्हरलेस हॅचबॅकमध्ये वापरण्यात आलेल्या ऑटोनॉमस टेक्नोलॉजीला सर्वात पहिल्यांदा IIT-बॉम्बे येथे झालेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स चॅम्पियनशिप (NRC) मध्ये संगणक तंत्रज्ञानाचा विद्यार्थी कुशल तानाजी शिळीमकर यांने सादर केलं होतं. तेव्हाच शिळीमकरांने त्याच्या फुल-स्टॅक ड्रायव्हरलेस ऑटोमोबाईल स्टार्टअपची बीजे पेरली.
प्रत्येक पैलू तपासले गेले
त्याने प्रथम प्रोटोटाइपवर काम केलं आणि NRC मध्ये नियंत्रित वातावरणात त्याच्या एआई-संचालित ऑटोनॉमस वाहनाची चाचणी केली. यात त्यांनी तंत्रज्ञानाच्या पादचारी नियंत्रण प्रणाली आणि टक्कर टाळण्याच्या प्रणालीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व मूलभूत रस्त्यांची परिस्थिती कृत्रिमरित्या तयार केल्या आणि ही यंत्रणा तपासून घेतली.
शिळीमकर यांची कंपनी सध्या भारतीय ग्राहकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञान विकसित करत आहे. “आमची ड्रायव्हरलेस कार सर्वांना कामावर घेऊन जाण्यासाठी फक्त काही महिन्यांनी सेवेत दाखल होणार आहे”, असं देखील शिळीमकर म्हणाले.