२०२१ हे वर्ष संपणार आहे आणि ऑटो कंपन्या त्यांच्या वाहनांवर वर्षाच्या शेवटी सूट देत आहेत. मात्र, या कालावधीतील गेल्या काही वर्षांचा विचार करता ही सूट बंपर ऑफर म्हणता येणार नाही. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी देखील डिसेंबर महिन्यात आपल्या कारवर ४८ हजार रुपयांची सूट देत आहे. मात्र, ही कंपनी एरिना रेंजच्या कारवर ही सूट देत आहे. जाणून घेऊया कोणत्या गाड्यांवर किती सूट मिळत आहे…

Maruti Alto
मारुती सुझुकी तिच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक अल्टोवर २०,००० रुपयांचं कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे. अल्टोच्या स्टँडर्ड ट्रिमवर हा डिस्काउंट मिळेल.
तर इतर ट्रिम्सवर ३०,००० रुपयांचं कॅश डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.
तसंच अल्टोच्या CNG वर्जनवर फक्त कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाईल.

Maruti S-Presso और Wagon-R
मारुती कंपनीच्या मायक्रो SUV M-Presso वर १५,००० रुपयांचं कॅश डिस्काउंट देत आहे.
याशिवाय, कंपनी नोव्हेंबरमध्ये मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कार Wagon-R वर २० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देत आहे.
दोन्ही गाड्यांना १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.
दोन्ही कारच्या CNG वर्जनवर फक्त कॉर्पोरेट डिस्काउंट वैध असेल.़

Maruti Celerio आणि Swift
अलीकडेच मारुतीने नवीन जनरेशन सेलेरियो लाँच केली आहे. विशेष बाब म्हणजे कंपनी या न्यू जनरेशन कारवरही डिस्काउंट देत आहे.
Celerio वर, कंपनी पाच हराज रूपयांचं कॅश डिस्काउंट, दहा हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.
स्विफ्टच्या Lxi आणि Vxi प्रकारांवर २०,००० रुपयांचं कॅश डिस्काउंट आणि Zxi आणि Zxi+ व्हेरिएंटवर १५,००० रुपयांचं डिस्काउंट देत आहे.
दुसरीकडे, स्विफ्टला १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.

आणखी वाचा : Driverless Car: भारतात धावणार ड्रायव्हरलेस कार, मुंबईतली कंपनी पुढच्या वर्षी करणार लॉंच

Swift Dzire आणि Vitara Brezza
Swift DZire वर १०,००० रुपयांचं कॅश डिस्काउंट, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २५०० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.
तर दुसरीकडे Vitara Brezza वर १०,००० रुपयांचं कॅश डिस्काउंट मिळेल. याशिवाय, ब्रेझावर १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.

Maruti Ertiga और Maruti Eeco
मारुती कंपनी डिसेंबर महिन्यात Ertiga वर कोणतीही सूट देत नाहीये. दुसरीकडे 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या Ertiga ने ७ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला. Ertiga कार १६ एप्रिल २०१२ रोजी लाँच झाली.
मारुतीच्या इको कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर कंपनी २० हजार रुपयांचं कॅश डिस्काउंट, १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.
Eeco च्या पेट्रोल आणि CNG वर्जनवर ३,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील असेल.

Story img Loader